esakal | UGCच्या विद्यापीठांना सूचना, 30 सप्टेंबरपर्यंत प्रथम वर्षाचे अ‍ॅडमिशन करा
sakal

बोलून बातमी शोधा

College-Students

UGCच्या विद्यापीठांना सूचना, 30 सप्टेंबरपर्यंत प्रथम वर्षाचे अ‍ॅडमिशन करा

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission - UGC) प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाची ( first-year courses )2021-22ची अतिम प्रवेश(admission) प्रक्रिया 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पुर्ण करण्याची सुचना विद्यापीठ आणि महाविद्यालयांना(universities and colleges ) दिली आहे. तसेच 1 ऑक्टोबरपासून शैक्षणिक सत्र 2021-2022(academic sessions 2021-22 ) सुरु झाले पाहिजे असेही सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयांसाठी परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाबाबत युजीसीने शुक्रवारी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

हेही वाचा: अक्षय बावस्कर 'Niper JEE'मध्ये दिव्यांग प्रवर्गातून पहिला

युजीसीचे सचिव, राजेश जैन यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकासंदर्भात त्यांनी नवीन मार्गदर्शक सूचना या पत्रामध्ये दिल्या आहेत

"सत्र 2021-2022 च्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण करावेत. उर्वरित रिक्त जागेच्या प्रवेशाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 असेल. परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी संबंधित कागदपत्रे 31 डिसेंबर 2021 पर्यंत स्वीकारली जाऊ शकतात'' असे विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात युजीसीने सांगितले आहे.

हेही वाचा: पाय घसरून विहिरीत पडले आजोबा, अग्निशमन दलानं वाचवले प्राण

शैक्षणिक सत्र 2021-2020च्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र / वर्ष 1 ऑक्टोबर 2022पासून सुरू होईल.

यूजीसीने दिलेल्या सुचनेनुसार, चालू शैक्षणिक सत्र 2020-21 साठी टर्मिनल सेमेस्टर किंवा अंतिम वर्षाची परीक्षा 31 ऑगस्ट 2021 नंतर ऑफलाईन (पेन आणि पेपर) ऑनलाइन किंवा मिश्रित (ऑनलाइन + ऑफलाइन) मोडमध्ये घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियम आणि मार्गदर्शक तत्वानुसार पार पडली पाहिजे.

सीबीएसईच्या 12 वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल 31 जुलै 2021 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. जर 12 वीच्या निकालाच्या घोषणेस उशीर झाला तर विद्यापीठे व महाविद्यालये पुढील शैक्षणिक सत्र 18 ऑक्टोबर, 2021 पर्यंत सुरू करू शकतात." तोपर्यंत ऑनलाइन , ऑफलाइन किंवा मिश्र पध्दतीनुसारमध्ये सुरू शिकवण्याची आणि शिकण्याची प्रक्रिया सूरू राहील, असही यूजीसीने स्पष्ट केले.

loading image