स्वतःचा शोध

अत्यंत कठोरपणे स्वतःची तपासणी कर. मन इतस्ततः भटकेल. त्याकडे लक्ष देऊ नको.
Your True Self
Your True Selfsakal
Updated on

- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक

बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत

तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा

शोध लागत आहे मला

माझी मीच किती अनोळखी

होते स्वतःला

माहीत नव्हते मला माझे बळ,

माझी दुर्बलता,

सतत मला वेढून बसलेली

माझी भीरुता!

- शांता शेळके

पहिली पायरी राजूने सांगितली तशी पार केली. शांत जागा शोधली. स्वतपासणीसाठी मनोभूमिका तयार केली, श्वासांवर लक्ष केंद्रित केले. स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहून स्वतःच्या कलाकौशल्यांचा, बलस्थानांचा, अनुभवांचा, प्रेरणास्थानांचा शांतपणे विचार करायला सुरुवात केली.

अत्यंत कठोरपणे स्वतःची तपासणी कर. मन इतस्ततः भटकेल. त्याकडे लक्ष देऊ नको. स्वयंतपासासाठी मनाला अत्यंत सजगपणे मनाला, ताळ्यावर आणत रहा. अशा अगदी प्राथमिक सूचना राजूला द्याव्या लागल्या नाहीत.

‘अरे बाबा, आता पुढे काय करायचे ते तर सांगशील ना?’’ राजूची उत्सुकता फारशी न ताणता त्याला पुढील पायरीकडे मी नेले.

स्वतःमध्ये डोकावून बघणे संपले असेल आणि आत्मपरिक्षण करून झाले असेल तर राजूला वही पेन घेऊन यायला सांगितले. खालीलप्रमाणे एक टेबल त्याच्याकडून तयार करून घेतला.

1) आदर्श

व्यक्तिमत्त्वास लागणारे सर्व गुणधर्म/ जीवनकौशल्ये, फक्त यादी या स्तंभात लिहा.

2) बलस्थाने

तुमच्या फायद्याचे, तुमचे सकारात्मक गुणधर्म, कौशल्य आदी या स्तंभात लिहा.

3) कमतरता, त्रुटी

कमतरता, तुम्हाला झगडावे लागते, ज्यामध्ये सुधारणा आवश्यक अशा बाबी इथे लिहा.

4) संधी

क्रमांक २ च्या स्तंभातील ज्या बलस्थानांचे आधारे तुमचा विकास/फायदा होऊ शकतो, ते इथे लिहा.

5) आव्हाने

अंतर्बाह्य अडथळे, प्रगतीस मारक अशा बाबी इथे लिहा.

खटपट्या परंतु एखाद्या गोष्टीला फारशा गंभीरपणे न घेणाऱ्या राजूला मला काही सूचना द्याव्या लागल्या. स्वशोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे दिवसातील निवांत असा किमान एक तास तरी वेगळा काढून, स्वतःचीच अत्यंत तटस्थपणे व कठोरपणे करण्याची ही बाब आहे. आपण स्वतःबद्दलच काय काय विचार करतो हे एकांत होऊन शोधणे गरजेचे आहे. या स्वशोधाला सराव लागतो. स्वतःशीच गप्पा मारून, डोकेफोड, विचारमंथन करण्याची सवय लागते. आयुष्याचे नेमके काय करायचे आहे? आपल्या जगण्याचा हेतू नेमका काय आहे? काही नेमके ध्येय ठरवले आहे का? पुढे जाण्यापूर्वी स्वतःशीच या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधावी लागतील. मांडावी लागतील. स्वयंमूल्य निर्धारणासाठी पुढील काही बाबींचा विचार करावा लागणार आहे. स्वसंवादावर लक्ष केंद्रित करून, अत्यंत सजगपणे तो लक्षात ठेवण्याचा सराव करावा लागणार आहे.

राजूने मान डोलावली. एकंदरीत त्याला, त्याचे स्वतःबद्दलच काय समज-गैरसमज, मते आहेत, यांचा धांडोळा घ्यायला सांगितले.

‘हे भलतेच अवघड आहे.’ इति राजू

‘हां आहे अवघड परंतु अशक्य नाही.’ मी त्याला जरा आश्वस्त केले.

‘प्रत्येक स्तंभ भरण्यासाठी काही पायऱ्या आहेत. त्या आत्ता सांगू की ब्रेक घ्यायचा?’

ब्रेक घ्यायचा असे म्हणून राजूने हुश्श केले. परंतु त्याच्या डोळ्यातील उत्सुकतेची झाक काही गेलेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com