‘नीट’ : नीट समजून घेताना

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा भारतातील वैद्यकीय इच्छुक विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)द्वारे घेतली जाते.
NEET Exam
NEET Examsakal
Updated on

- रिना भुतडा, करिअर समुपदेशक

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा भारतातील वैद्यकीय इच्छुक विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाते. या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये मूल्यमापन केले जाते. ‘नीट’मध्ये यश मिळवण्यासाठी अचूकता, वेळेचे व्यवस्थापन आणि मागील वर्षांच्या प्रश्नांचा सराव महत्त्वाचा आहे.

‘नीट’द्वारे होणारे प्रवेश - एमबीबीएस (मेडिसिन), बीडीएस (दंतवैद्यक शास्त्र), बीएएमएस (आयुर्वेदिक), बीएचएमएस (होमिओपॅथी), बीयुएमएस (युनानी), बीव्हीएससी अँड एएच (पशुवैद्यक शास्त्र), बीएसएमएस (सिद्ध मेडिसिन), बीपीटी (फिजिओथेरपी), बीएस्सी नर्सिंग.

परीक्षेचे स्वरूप आणि स्पर्धा

यावर्षी २३ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ७२० गुणांच्या या परीक्षेमध्ये १८० बहुपर्यायी प्रश्न तीन तासात सोडवावे लागतात. भौतिकशास्त्र (४५), रसायनशास्त्र (४५), आणि जीवशास्त्र (९०). अभ्यासक्रम अकरावी-बारावी ‘एनसीईआरटी’वर आधारित असतो. प्रत्येक प्रश्न चार गुणांचा असून चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा होतो. त्यामुळे अचूकता आणि योग्य रणनीती आवश्यक आहे.

राष्ट्रीय स्तरावरील उपलब्ध जागा

  • एमबीबीएस - देश पातळीवर १.१८ लाख तर महाराष्ट्रात १०,८४५ जागा (सरकारी व खासगी महाविद्यालये) आहेत.

  • बीडीएस - सुमारे २७,८०० जागा

  • एम्स व जीपमर - आता ‘नीट’अंतर्गत समाविष्ट

  • राज्य कोटा - ८५ टक्के व अखिल भारतीय कोटा - १५ टक्के

शासकीय, खासगी महाविद्यालये व डिम्ड विद्यापीठे असे तीन पर्याय असतात, ज्यांच्या फीमध्ये मोठा फरक असतो.

सामान्य गैरसमज

  • ‘नीट’ फक्त ‘एमबीबीएस’साठी आहे - ही परीक्षा एकूण ९ अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी उपयुक्त आहे.

  • फक्त बोर्ड परीक्षेचा अभ्यास पुरेसा आहे - ‘एनसीईआरटी’ हा ‘नीट’चा पाया आहे, परंतु सराव चाचण्या, मॉक टेस्ट वेळ व्यवस्थापन व अचूकता सुधारण्यासाठी आवश्यक आहे.

  • ‘नीट’च्या तयारीसाठी गणित विषय सोडणे - फिजिक्समधील गणिते सोडवायला, गणित विषयाची जोड उपयोगी ठरते.

तयारीसाठी उपयुक्त उपाययोजना

1) संरचित अभ्यास योजना - प्रत्येक विषयासाठी वेळ ठरवा आणि नियमित सराव करा.

2) मॉक टेस्ट आणि सराव प्रश्नपत्रिका - वेग आणि अचूकता सुधारण्यासाठी.

3) संकल्पनांची स्पष्टता - ‘एनसीईआरटी’ पुस्तके, संदर्भ साहित्य आणि व्हिडिओ व्याख्याने यांचा वापर.

4) वेळेचे व्यवस्थापन - प्रश्न सोडवताना कार्यक्षमतेने वेळ वाटून घ्या.

5) मागील वर्षांची प्रश्नपत्रिका - प्रश्नांचा नमुना आणि ट्रेंड समजून घ्या.

6) आरोग्य व्यवस्थापन - परीक्षेला सामोरे जाताना व्यायाम, मेडिटेशन, संतुलित आहार या माध्यमातून आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे.

7) नकारात्मक गुण कमी करण्यासाठी अंदाजे उत्तरे टाळा.

‘नीट’ कट-ऑफ ट्रेंड

खुल्या प्रवर्गासाठी २०२४मध्ये महाराष्ट्रातील शासकीय महाविद्यालयाचे कट ऑफ मार्क्स (शेवटच्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुण) ‘एमबीबीएस’साठी ६२९, ‘बीडीएस’साठी ५८७, ‘बीएएमएस’साठी ५१८ शेवटच्या राउंड (स्ट्रे व्हेकन्सी) प्रमाणे होते (वर्षानुसार बदलते). बोर्ड परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण (सामान्य प्रवर्गासाठी) आणि ४० टक्के गुण (आरक्षित प्रवर्गासाठी) आवश्यक आहेत.

निष्कर्ष

‘नीट’ ही एक आव्हानात्मक परंतु योग्य रणनीतीने यशस्वी करता येणारी परीक्षा आहे. संकल्पनांची स्पष्टता, नियमित सराव आणि प्रभावी वेळ व्यवस्थापन यावर भर दिल्यास विद्यार्थी सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com