Understanding Separation Anxiety disorder school
sakal
मागील लेखात आपण सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डरबद्दल माहिती घेतली. त्याची लक्षणे, कारण याची चर्चा केली. आपण आज उपचाराबद्दल माहिती घेणार आहोत.
औषधोपचाराबरोबरच तज्ज्ञांच्या बरोबर थेरपी सेशन्स महत्त्वाचे असतात. मुलांबरोबरच पालकांचं समुपदेशन आवश्यक ठरतं. शाळा व्यवस्थापनाचं सहकार्य महत्त्वाचं ठरतं. उपचाराचा भाग असलेली प्ले थेरपी आणि स्कूल बेस्ड समुपदेशनही उपयोगी ठरतं. पालकांच्या वागणुकीमध्ये काही सुधारणाही, आवश्यक ठरल्यास थेरपी सेशन दरम्यान सुचवल्या जातात.