- भालचंद्र लिमये, सुलेखनकार
अक्षरे तीच असली तरीही एखाद्या सुलेखनकाराने गिरवल्यावर ती वेगळी भासतात. कारण, त्याने केवळ अक्षरांकडे न पाहता त्यामागचा आशय समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. शैली, मांडणी, अक्षरांना दिलेलं वळण यातून वेगळीच अभिव्यक्ती समोर येते. त्यामुळे सुलेखन ही कला आहे हे आपल्याला जाणवतं.