खुशखबर! 'या' क्षेत्रात तब्बल 5 कोटी रोजगाराच्या संधी

सुस्मिता वडतिले 
Friday, 11 September 2020

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे अनेकांवर संकट कोसळले आहे.जे काम होते ते ही बंद पडले आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. म्हणजेच अनेकांना आता रोजगाराच्या संधी मिळणार आहे. 

पुणे : अनेक दिवसांपासून जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अशा दिवसांत काय करावे ही चिंता अनेकांना सतावत आहे. या दिवसांमध्ये अनेकांवर बेरोजगारी ओढवली आहे. यातच सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंदाची बातमी दिली आहे. नितीन गडकरींनी सांगितले की, येणाऱ्या पाच वर्षांमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये पाच कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे सरकारचे लक्ष आहे. 

एमएसएमई, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री गडकरी यांनी असे सांगितले की, त्यांचे लक्ष सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी)चे योगदान 30 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांपर्यंत करावे आणि निर्यात 49 टक्क्यांनी वाढवून 60 टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व एमएसएमई क्षेत्रातून 11 कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो.

तसेच पुढे गडकरी म्हणाले की, इनोवेशन आणि आंत्रप्रेन्योरशिप यांना केली जाणारी मदत ही अधिक व्यापक करण्याची खूप गरज आहे. त्यामुळे नवीन प्रतिभाशाली लोकांना पुढे जाण्यासाठी नक्कीच संधी मिळेल. एमएसएमई मंत्रालयाकडून जारी केलेल्या वक्तव्यानुसार गडकरींनी सांगितले की, इनोवेशनमध्ये अधिक शोध करत नवनवीय पर्याय शोधण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याची सध्या गरज आहे. एमएसएमई हे क्षेत्र देशातील विकासाचं इंजिन आहे, आणि त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. मला विश्वास आहे की, ही नवी कल्पना या क्षेत्राला अधिक संपन्न करण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. 

आत्मनिर्भर भारत अरायज अटल न्यू इंडिया चॅलेंजचं कौतुक...  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी एका वर्च्युअल मिटिंगला संबोधित करताना नीती आयोगाच्या आत्मनिर्भर भारत अरायज अटल न्यू इंडिया चॅलेंजचं कौतुक केलं आहे. त्यांनी विविध क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अडचणींवर उपाय शोधण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सरप्लस तांदळाचे उदाहरणही दिले तसेच  पुढे सांगितलं की, याचा उपयोग इथेनॉलच्या उत्पादनात केलं जाऊ शकतो. यामुळे हरित इंधनात देशाला जीवाश्म इंधानांचा पर्याय समोर असणार आहे. 

गडकरी पुढे म्हणाले की, आपल्या देशाच्या विकासाला भविष्यामध्ये त्याचवेळी गती मिळेल, जेव्हा देशामध्ये मागास आणि आदिवासी भागामध्ये सहभागी होतील. सध्याच्या कोरोनाच्या या दिवसात सर्वत्र लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठे नुकसान झालेले आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातसुद्धा मोठी घट झालेली आहे. येत्या पुढील दिवसातही अर्थव्यवस्थेबाबत योग्य तो निर्णय घेण्यात आलेला नाही, तर आपल्याला मोठा झटका सहन करावा लागू शकणार आहे. भारताबरोबरच जगातील इतर देशांमध्येसुद्धा कमी जास्त प्रमाणात अर्थव्यवस्थेची सगळीकडे हीच परिस्थिती सुरु आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister Nitin Gadkari has created five crore jobs in micro small and medium enterprises