बालपणी पाहिलेलं जिल्हाधिकारी होण्याचं 'स्वप्न' पूर्ण

Sachin Lande
Sachin Landeesakal

सातारा : ‘तू मोठेपणी कोण होणार’ या प्रश्नावर त्या मुलाचे उत्तर होते जिल्हाधिकारी (Collector). इयत्ता पाचवीत, सातवीत, दहावीत असताना प्रत्येक वेळी मुलाचे हेच उत्तर ठरलेले असायचे. अखेर हेच उत्तर त्याने काल शब्दशः खरे करून दाखविले. सचिन देवराम लांडे (Sachin Lande) याच्या यशाची ही कहाणी. शुक्रवारी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Central Public Service Commission) परीक्षेत त्याने उत्तुंग यश मिळविले.

Summary

सचिनचं प्राथमिक शिक्षण वाईतील महिला स्नेहवर्धक समाज प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूलमध्ये झाले.

त्यात संपूर्ण देशात ५६६ वी रँक मिळविली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कमावलेले त्याचे यश सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनले आहे. पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील शिरोली (पूर, ता. जुन्नर) हे त्याचे गाव. त्याचे वडील देवराम लांडे हे वाईच्या शासकीय मुद्रणालयात चौकीदार. त्याची आई द्रौपदाबाई या देखील जेमतेम शिकलेल्या. सचिन मात्र बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचा. त्यामुळेच पहिली ते दहावीपर्यंत तो अभ्यासात कायमच अव्वल असायचा.

Sachin Lande
कऱ्हाडच्या तुषारची IPS पदाला गवसणी; देशात पटकावली 224 वी रॅंक

त्याचे प्राथमिक शिक्षण वाईतील महिला स्नेहवर्धक समाज प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूलमध्ये झाले. पुढे तो पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाला. पुण्यातच त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मग तो नायब तहसीलदारपदाची परीक्षाही उत्तीर्ण झाला. मात्र, जिल्हाधिकारी हेच त्याचे स्वप्न होते. आमदार मकरंद पाटील, नगराध्यक्ष अनिल सावंत, चरणदादा गायकवाड, प्रदीप चोरगे, प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर आदींनी त्याचे अभिनंदन केले. माजी उपजिल्हाधिकारी दादाभाऊ जोशी, कौस्तुभ बोंद्रे तसेच आजवरच्या सर्व शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

Sachin Lande
वाह, क्या बात है! टाॅपर टीना डाबीच्या बहिणीचीही युपीएससीत बाजी

जिल्हाधिकारीपदाचे स्वप्न...

बालपणापासून सचिनचे जिल्हाधिकारी पदाचे स्वप्न होते. अलीकडेच तो नायब तहसीलदार या पदाची परीक्षाही उत्तीर्ण झाला होता. मात्र, आपण एक ना एक दिवस जिल्हाधिकारी पदापर्यंत नक्कीच पोचू हा आत्मविश्वास त्याला होता. हे स्वप्न अगदी कमी काळातच त्याने सत्यात उतरविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com