esakal | UPSC NDA II Exam 2021 : 400 पदांची भरती,वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs

UPSC NDA II Exam 2021 : 400 पदांची भरती,वाचा सविस्तर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

UPSC NDA II Exam 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (National Defence Academy) आणि नौदल अकादमी (Naval Academy Exam) परीक्षा (II) 2021 ची अधिकृत सूचना जारी केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 29 जून 2021 आहे. इच्छूक उमेदवार फक्त अधिकृत संकेतस्थळावरुनच अर्ज करु शकतात.

upsconline.nic.in या संकेतस्थळावरचर आपला परीक्षा अर्ज भरायचा आहे. इतर कोणत्याही संकेतस्थळावरुन अर्ज भरता येणार नाही. आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या सर्व नियम व अटीस पात्र असल्यासच अर्ज ग्राह्य धरता येईल. अन्यथा अर्ज बाद केला जाणार आहे. 6 जुलै 2021 ते 12 जुलै 2021 पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकतो.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नॅशनल डिफेंस अॅकॅडमीमध्ये एकूण 370 (208 आर्मीसाठी, 42 नौदलासाठी आणि 120 पोस्ट एअर फोर्स) आणि नौदल अॅकॅडमीमध्ये 30 (10+2 कॅडेट एंट्री स्कीम) - पदांची भरती काढली आहे. फक्त अविवाहित पुरुषच यासाठी अर्ज करु शकतात. तसेच उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2003 पूर्वी आणि 1 जानेवारी, 2006 नंतर झालेला नसावा.

loading image