esakal | UPSC कडून अधिसूचना; प्राचार्यांच्या ३६३ जागांसाठी भरती
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC Commission

UPSC कडून अधिसूचना; प्राचार्यांच्या ३६३ जागांसाठी भरती

sakal_logo
By
नामदेव कुंभार

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) प्राचार्यांच्या ३६३ पदांसाठी नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 10 जुलै 2021, शनिवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ www.upsc.gov.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख 29 जुलै 2021 आहे.

याआधी 24 एप्रिल ते एक मे 2021 रोजी दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागातील प्राचार्य पदाच्या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून आयोगामार्फत ३६३ रिक्त पदांच प्रक्रिया तहकूब केली होती. पण आता पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. 363 प्राचार्यांच्या पदापैकी 155 महिलांसाठी तर 208 पुरुषांसाठी पदं राखीव आहेत.

हेही वाचा: वन मंत्रिपदाचा प्रस्ताव मान्य नाही, अध्यक्षपद काँग्रेसकडेच!

पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षक पदवी (बीएड) असणे बंधनकाकरण आहे. याव्यतिरिक्त उमेदवारांना अध्यापनात कमीतकमी दहा वर्षांचा अनुभव असावा.

वय आणि निवड प्रक्रिया -

या पदांसाठी उमेदवारांची परीक्षा व मुलाखतींमधील मूल्यांकनाच्या आधारे निवड केली जाईल. अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासाठीच्या आणखी माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्या.

loading image