UPSC नं अनेक पदांसाठी जाहीर केली भरती

UPSC Recruitment 2022
UPSC Recruitment 2022esakal
Summary

उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगांतर्गत चांगला पगार दिला जाणार आहे.

UPSC Recruitment 2022, 7th Pay Commission : केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक संचालक, सहाय्यक प्राध्यापक यासह अनेक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केलीय. इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

UPSC भरतीत समाविष्ट असलेल्या रिक्त पदांवर नोकरी मिळविणाऱ्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगांतर्गत (7th pay commission) चांगला पगार दिला जाणार आहे. या भरती मोहिमेद्वारे विविध पदांवरील एकूण 78 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2022 आहे.

UPSC Recruitment 2022
'या' पदासाठी होणार 8000 हून अधिक रिक्त जागांची भरती

UPSC Vacancy 2022 : पदांनुसार रिक्त जागा

  • सहाय्यक संपादक (ओरिया) : 1 पद

  • सहाय्यक संचालक : 16 पदे

  • इकोनॉमिक ऑफिसर : 4 पदे

  • प्रशासकीय अधिकारी : 1 पद

  • यांत्रिक अभियंता : 1 पद

  • व्याख्याता : 4 पदे

  • शास्त्रज्ञ 'बी' : 2 पदे

  • केमिस्ट : 5 पदे

  • कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ : 36 पदे

  • संशोधन अधिकारी : 1 जागा

  • सहाय्यक प्राध्यापक : 7 पदे

  • एकूण रिक्त पदांची संख्या - 78 पदे

UPSC Recruitment 2022
बँकेनं चुकून ग्राहकांच्या खात्यात पाठवलं तब्बल 1300 कोटी

कोण अर्ज करू शकतो?

सहाय्यक संपादक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि ग्रंथालयातील पदवी, डिप्लोमा असणं आवश्यक आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या सहाय्यक संचालकासाठी नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक ऑफिसरसाठी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र किंवा व्यवसाय या विषयांत पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. इतर पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची माहिती अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.

अर्ज फी : उमेदवारांना एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोखीनं किंवा एसबीआयच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून अथवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून फक्त 25 रुपये शुल्क भरावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com