Success Story: 'आई' बनल्यानंतर स्वप्ने संपत नाहीत! बाळंतपण ३ सप्टेंबरला,UPSC पेपर २० ला; १७ दिवसांचे बाळ सांभाळत झाली IAS...

IAS Malavika Nair: मातृत्वाची वेदना अन् अभूतपूर्व जिद्द; केरळच्या मालविका नायर यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया ४५ वा रँक मिळवून रचला इतिहास!
IAS Malavika Nair: Cracks UPSC AIR 45 Just 17 Days After Delivery

IAS Malavika Nair: Cracks UPSC AIR 45 Just 17 Days After Delivery

esakal 

Updated on

UPSC Success Story: मातृत्व ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर, पण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारी अवस्था असते. एका बाजूला नवजात अर्भकाची माया आणि दुसरीकडे आयुष्यातील सर्वात मोठे ध्येय, अशा दोन्ही वळणावर उभ्या राहिलेल्या केरळच्या मालविका नायर यांनी रचलेला इतिहास सर्वांनाच प्रेरित करणारा ठरला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत ऑल इंडिया ४५ वा रँक मिळवून त्यांनी IAS बनण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.

ही केवळ एका परीक्षेच्या यशाची कथा नसून एका आईच्या असीम वेदना, अढळ जिद्द आणि कधीही हार न मानणाऱ्या आत्मविश्वासाची भावनिक संघर्षगाथा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com