

agri graduates Agri Junction scheme
esakal
उत्तर प्रदेश सरकारने कृषी क्षेत्रातील शिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी देतानाच शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळ आधुनिक कृषी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘ॲग्री जंक्शन योजना’ सुरू केली आहे. या केंद्रांवर शेतीसाठी आवश्यक साहित्य, तांत्रिक मार्गदर्शन आणि आधुनिक कृषी उपकरणे एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहेत. राज्यात आतापर्यंत ६,६०८ हून अधिक ॲग्री जंक्शन सुरू करण्यात आले असून, २०२७ पर्यंत ही संख्या १० हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.