

Uttarakhand Shikshan Yojana
esakal
अल्पसंख्याक समाजातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबतच बालविवाहाला आळा घालण्यासाठी उत्तराखंड सरकारकडून 'मोफत सायकल योजना' राबवली जाते. या योजनेअंतर्गत ८ वी उत्तीर्ण पात्र विद्यार्थिनींना शाळेत पुढील शिक्षण घेण्यासाठी मोफत सायकल दिली जाते.
योजनेचा लाभ मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारसी या अधिसूचित अल्पसंख्याक समुदायांतील विद्यार्थिनींना मिळतो. विद्यार्थिनी उत्तराखंडची रहिवासी असणे आवश्यक आहे.