

startup uttarakhand scheme
esakal
उत्तराखंडमध्ये नवीन उद्योग, नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने 'स्टार्टअप उत्तराखंड धोरण' लागू केले आहे. या धोरणांतर्गत पात्र स्टार्टअप्सना आर्थिक मदतीसोबतच मार्केटिंग, पेटेंट, कच्चा माल, जमीन आणि जीएसटीसंबंधी विविध सवलती दिल्या जात आहेत. पात्र श्रेणीतील स्टार्टअप्सना एका वर्षासाठी दरमहा १५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते.