

uttarakhand teacher spend 25 lakhs for building school
esakal
शिक्षक दिनाच्या निमित्ताने उत्तराखंडमधील रामनगर येथील शिक्षक नवेंदू मठपाल यांच्या कार्याची प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. शासकीय इंटर कॉलेज ढेला येथे इंग्रजीचे अधिव्याख्याता असलेल्या मठपाल यांनी आर्थिकदृष्ट्या वंचित, मजूर आणि बुक्सा आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी स्वतःची २५ लाख रुपयांची आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून शाळा उभारली. त्यांच्या सायंकालीन शाळांमधून सध्या ४०० हून अधिक मुले मोफत शिक्षण घेत आहेत.