Opportunities in Data Science
sakal
- प्रतीक्षा वाघ, प्राध्यापिका
डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाइन बँकिंग आणि ई-कॉमर्समुळे प्रचंड प्रमाणात डेटा तयार होत आहे. या माहितीचे विश्लेषण करून त्यातून योग्य निर्णय घेणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे डेटा सायन्स इंजिनिअरिंग हे क्षेत्र वेगाने उदयास आले असून ते आशादायक करिअर पर्याय ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते ‘डेटा हे नव्या युगातील तेल’ आहे, कारण उद्योग, संस्था आणि शासन व्यवस्था यांचा पाया आता माहिती आणि विश्लेषणावर आधारित आहे.