nutritionist and dietetics
nutritionist and dieteticssakal

करिअर अपडेट : न्यूट्रिशनिस्ट व डायटेटिक्स

न्यूट्रिशनिस्ट आणि डायटेटिक्समधील पदवीधरांना चांगली संधी निर्माण होत आहे.
Published on
Summary

न्यूट्रिशनिस्ट आणि डायटेटिक्समधील पदवीधरांना चांगली संधी निर्माण होत आहे.

- विद्यावाचस्पती विद्यानंद

न्यूट्रिशनिस्ट आणि डायटेटिक्समधील पदवीधरांना चांगली संधी निर्माण होत आहे. न्यूट्रिशनिस्ट आणि डायटेटिक्स अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या पदवीधरांना आणि पदव्युत्तर पदव्या घेतलेल्या उच्च शिक्षित तरुणांना चांगली नोकरी मिळू शकते.

करिअरचे पर्याय

डाएटिशियन हा लोकांच्या खाण्यापिण्यासह वाईट सवयींवर देखील लक्ष ठेवतो. नियमित व्यायाम, प्राणायाम तसेच दररोजच्या आहाराचे प्रमाण ठरवून देत असतो. मोठमोठ्या दवाखान्यामध्येही रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डाएटिशियनची नेमणूक केलेली असते. ‘डाएटिक्स’ अर्थात आहार शास्त्रात खाण्या-पिण्या संबंधित माहिती देऊन आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, याचा अभ्यासक्रम असतो. डाएट, न्यूट्रिशन, योगाचे अभ्यासक्रम पूर्ण करून फिटनेस ट्रेनर, न्यूट्रिशन एक्स्पर्ट म्हणून काम करता येतं. कामाच्या अनियमित वेळांचा साहजिकच खाण्याच्या वेळांवरही अनवधानाने परिणाम होत असतो.

व्यावसायिक संधी

  • क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट - खासगी हॉस्पिटल्स, ओपीडी आणि नर्सिंग होम्समध्ये क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट काम करू शकतात.

  • न्यूट्रिशन अ‍ॅडव्हायझर - हे तज्ज्ञ कोणत्याही संस्थेशी निगडित न राहता देखील डॉक्टर असल्यास स्वतंत्र प्रॅक्टिस करू शकतात. लोकांना पोषणाशी निगडित सल्ला आणि मार्गदर्शन ते करू शकतात. स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करणेही शक्य होऊ शकते.

  • कम्युनिटी न्यूट्रिशनिस्ट - सरकारी आरोग्य संस्था, हेल्थ अँड फिटनेस क्लब आणि डे केअर सेंटर अशा ठिकाणी या व्यक्‍ती काम करू शकतात.

  • न्यूट्रिशनिस्ट - न्युट्रिशनिस्ट हे क्लिनिकल आणि आहारशास्त्र यांतील तज्ज्ञ असतात. मोठ्या संस्थांमध्ये काम करणारे तज्ज्ञांचे व्यवस्थापन करण्याचे काम ते करत असतात. त्याशिवाय यांना न्यूट्रिशनिस्ट किंवा आहारतज्ज्ञ म्हणून व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही सोपवली जाते. त्याशिवाय कोणत्याही संस्थेशी निगडित न राहता डॉक्टरसारखी स्वतंत्र प्रॅक्टिस करू शकतात.

अभ्यासक्रमासाठी पर्याय

न्यूट्रिशनिस्ट आणि डायटेटिक्समध्ये करिअर करण्यासाठी बारावीमध्ये भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन शिकलेल्या विद्यार्थ्यांना होम सायन्स, फूड सायन्स आणि प्रोसेसिंग म्हणजे आहारशास्त्र आणि प्रक्रिया या विषयांसह शास्त्र शाखेची पदवी मिळवता येते. फूड सायन्स अँड मायक्रोबायोलॉजी, न्यूट्रिशन, न्यूट्रिशन अँड फूड सायन्स आणि न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स यामध्ये बी.एस्सी ऑनर्स ही पदवी मिळवता येते. त्याशिवाय डायटेटिक्स अँड न्युट्रिशनमध्ये डिप्लोमा आणि फूड सायन्स अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये डिप्लोमा करता येऊ शकतो. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर याच विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी घेता येऊ शकते, एम. एस्सी करता येते. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वाव आहे. आहारशास्त्राची पदवीधारक विद्यार्थ्यांना एम.एस्सीला एक्झरसाईज फिजिशियन आणि न्यूट्रिशन असे विषय स्पेशलायझेशनला असतात.

अभ्यासक्रम राबविणाऱ्या शैक्षणिक संस्था

  • एसएनडीटी विद्यापीठ, मुबई

  • गुरू नानक विद्यापीठ, लुधियाना

  • इंदिरा गांधी शरीर शिक्षण विद्यापीठ, नवी दिल्ली

  • मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई

  • नागपूर युनिव्हर्सिटी, नागपूर

  • दिल्ली विद्यापीठ, दिल्ली

  • इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, दिल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com