

The Essence of Vijnanamaya Kosha: Developing Intellect and Wisdom
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
पंचकोश संकल्पनेतील अन्नमय, प्राणमय आणि मनोमय कोशांनंतर आता विज्ञानमय कोशाच्या माध्यमातून मानवी बुद्धीच्या विविध पैलूंचा विचार करू या. व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासात विवेक, तर्कशक्ती, निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कोश शिक्षणाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे.
निरीक्षण, स्मरण, आकलन, कार्यकारणभाव, अनुमान, निर्णयक्षमता, प्रतिभा आणि कल्पकता इत्यादी बुद्धीची सर्व कार्ये विज्ञानमयकोशामार्फत होतात. सृष्टीविषयी माहिती असलेल्या अशाश्वत गोष्टी दूर करून शाश्वत विचार समजून घेणे हे विज्ञानमय कोशाच्या विकासाचे मुख्य स्वरूप आहे. इंद्रियांच्या मर्यादांमुळे केवळ भास होणाऱ्या गोष्टी दूर करण्याची क्षमता विज्ञानमय कोशामुळे विकसित होते आणि त्यामुळे जगाचे खरे स्वरूप अधिक स्पष्ट होत जाते.