‘मास्टर्स’ आणि नोकरीची संधी

विलास सावरगावकर
Thursday, 23 January 2020

तुम्हाला कॉलेज ॲडमिशन झाल्यावर त्या कॉलेजकडून फॉर्म I-२० पाठवला जातो. हा फॉर्म घेऊनच आपण आपली अमेरिकन व्हिसासाठीची अपॉइंटमेंट घ्या. त्याला मार्कशीट, डिग्री, बँक लोन असल्यास त्याची कागदपत्रे, नोकरी करत असल्यास त्याचे पेपर्स हे सर्व बरोबर घेऊन जावे.

तुम्हाला कॉलेज ॲडमिशन झाल्यावर त्या कॉलेजकडून फॉर्म I-२० पाठवला जातो. हा फॉर्म घेऊनच आपण आपली अमेरिकन व्हिसासाठीची अपॉइंटमेंट घ्या. त्याला मार्कशीट, डिग्री, बँक लोन असल्यास त्याची कागदपत्रे, नोकरी करत असल्यास त्याचे पेपर्स हे सर्व बरोबर घेऊन जावे. आपण मुलाखतीला पूर्ण तयारीने जावे. आपण अमुक एक कॉलेज का निवडले, इतर किती कॉलेजला अर्ज केले होते? किती ठिकाणी ॲडमिशन झाली व त्यात हे कॉलेज आपण का निवडले हे सांगावे लागते. आपण वेगाने बोलतो, ते त्यांना कळायला वेळ लागतो, त्यामुळे हळू व स्पष्ट बोलावे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॉलेजला आल्यावर व्हिसा नियमानुसार आपणास लगेच कॉलेजच्या बाहेर नोकरी करता येत नाही. आपण ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये आलात की साधारण एप्रिल/मेपर्यंत आपले दुसरे सत्र पूर्ण झालेले असते. त्या वेळी आपणास बाहेर इंटर्नशिप किंवा नोकरी करायची असल्यास आधी आपल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसा ऑफिसची परवानगी घ्यावी लागते. जी कंपनी आपणास ही संधी देत आहे, तिला कॉलेजकडून मान्यता आहे की नाही हे तपासून घ्यावे. यासाठी आपल्या सिनियर मित्रांकडून सल्लाही घ्यावा. त्याने आधी त्या ठिकाणी काम केले होते का, प्रोजेक्ट पूर्ण केला होता का, योग्य परवानगी मिळाली होती का हे तपासावे. आपण एका कंपनीचे नाव सांगून दुसरीकडे कामाला जाऊ शकत नाही, कारण आपल्या रेकॉर्डमध्ये त्याची नोंदणी असते. त्यामुळे हा धोका पत्करू नका.

तुम्हाला ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये कॉलेजला कोर्सेससाठी परत येणे गरजेचे असते. आपण आपले कोर्सेस पूर्ण करून, थिसीस सबमिट करून आपल्या डिग्रीच्या संपूर्ण अटी पूर्ण केल्या असतील व सर्व फी भरून झाली असल्याचे कन्फर्म झाल्यावरच आपणास पदवीची परवानगी दिली जाते.

ही परवानगी ‘ईएडी’ (एम्प्लॉयमेंट ॲथॉराइज डॉक्युमेंटस्) अमेरिकन इमिग्रेशन यूएससीआयसीएसकडून अर्ज केल्यावर मिळते. यासाठी किमान नव्वद ते शंभर दिवस लागतात. ही परवानगी एक वर्षासाठी असते, त्यानंतर तुम्हाला अजून दोन वर्षे काम करण्याची संधी असते. त्यादरम्यान तुम्ही  H1B व्हिसासाठी अर्ज करू शकता. तुमचा नंबर लागल्यास तीन वर्षे काम करता येते. ‘ईएडी’ कार्ड असल्याने तुम्ही कुठल्याही कंपनीत नोकरी करू शकता. मात्र, या कंपनीची ‘यूएससीआयसीएस’कडे नोंदणी गरजेची आहे. या विषयी आपण पुढील भागात अधिक विस्तराने पाहूया.

शिक्षण  एज्युकेशन जाॅब्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vilas Savargaonkar article about Masters and Job opportunity