अमेरिकेत ‘मास्टर्स’ करताना...

विलास सावरगावकर
गुरुवार, 16 जानेवारी 2020

आज आपण अमेरिकेत विविध विषयांमध्ये करता येणाऱ्या मास्टर्स व डॉक्टरेट डिग्रीची माहिती घेणार आहोत.

आज आपण अमेरिकेत विविध विषयांमध्ये करता येणाऱ्या मास्टर्स व डॉक्टरेट डिग्रीची माहिती घेणार आहोत. प्रथम आपणास भारतात त्या विषयातील बॅचलर्स डिग्री मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. ती उत्तम मार्कांनी मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपण एकदा प्रोजेक्ट वा रिसर्च पेपर लिहिला असल्यास अतिशय उत्तम. तुम्हाला ॲडमिशनसाठी कमीत कमी तीन रेकमंडेशन लेटर लागतात, म्हणजे तीन प्रोफेसर, किंवा त्यातील एक जण तुमच्या विषयातील व्यावसायिक असला तरी चालेल. उदा. तुम्हाला एव्हिएशनमध्ये डिग्री मिळवायची असल्यास तुमचे दोन प्राध्यापक, एक वैमानिक व त्या संबंधित काम करणाऱ्या तज्ज्ञाचे शिफारस पत्र गरजेचे आहे. या पत्रात संबंधितांनी तुम्ही या विषयात करिअर करू इच्छिता व योग्य संधी मिळाल्यास तुम्ही त्याचा सुयोग्य उपयोग करून यशस्वी वाटचाल कराल, हे सांगणे फार महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर तुम्हाला Graduate Record Exam (GRE) व टेस्ट ऑफ इंग्लिश लॅंग्वेज (TOFEL) या दोन परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा पास वा नापास अशासाठी नसतात, तर तुमच्या गुणसंख्येवर प्रवेश ठरतो. यातील GRE तीन विभागांत असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सर्व परीक्षांची माहिती तुम्हाला अमेरिकन दूतावासाच्या संकेत स्थळावर मिळेल. 

तुम्हाला प्रवेशासाठी ओळख, वशिला, इतर कुठल्याही कोचिंगची वा एजंट किंवा एजन्सीची गरज नाही. पैसे देण्याची गरज नाही आणि आपण देऊही नयेत, ही कळकळीची विनंती. तुम्हाला इच्छित कॉलेज वा विद्यापीठामध्ये मार्गदर्शन उपलब्ध आहे. येथील प्राध्यापक तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. आजच्या तरुण मराठी विद्यार्थ्यांनी येथे उच्च शिक्षणासाठी जरूर यावे. अनेक आवाहने व अडचणी येऊ शकतात, पण त्यातून मार्ग नक्की निघतात. आपण पुढील भागात नियम, इमिग्रेशन, नोकरी यांतील संधी कशा मिळवाव्यात, याबद्दल चर्चा करू.

विलास सावरगावकर, न्यू जर्सी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vilas Savargaonkar article Masters in America