esakal | नोकरी टिकवायची कशी?

बोलून बातमी शोधा

नोकरी टिकवायची कशी?}

खासगी क्षेत्रामध्ये कमालीची स्पर्धा असते आणि स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास कामगिरी महत्त्वाची ठरते, वेळोवेळी आपली योग्यता सिद्ध करावी लागते. सध्या जगभरात बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत.

नोकरी टिकवायची कशी?
sakal_logo
By
विनोद बिडवाईक

आयुष्याचा चरितार्थ चालविण्यासाठी काहीतरी करावे लागते. काही जण व्यवसाय करतात, काही जण नोकरी करतात, काही जण सरकारी आस्थापनांमध्ये मोठ्या हुद्द्याच्या नोकरीसाठी नशीब आजमावतात, तर बहुतांश खासगी क्षेत्रात आपले आयुष्य घालवतात. यामधील बहुतांश आपल्या कामाबद्दल आनंदी नसतात. महागडे शुल्क देऊन मोठमोठ्या पदव्या घेऊनसुद्धा मनासारख्या नोकऱ्या मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. एका सर्वेक्षणानुसार, देशातील फक्त १५% कर्मचारी आपल्या कामाप्रती समाधानी आहेत. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे असलेली नोकरी टिकवून ठेवणे लोकांना महत्त्वाचे वाटत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

खरे तर आपला नोकरी करण्याचा उद्देश पैसे कमावणे हाच असल्यास ही अतिशय चिंतेची बाब आहे. सरकारी आस्थापनेमधील कर्मचाऱ्यांची परिस्थिती खासगी क्षेत्रापेक्षा वेगळी असते. खासगी क्षेत्रामध्ये कमालीची स्पर्धा असते आणि स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास कामगिरी महत्त्वाची ठरते, वेळोवेळी आपली योग्यता सिद्ध करावी लागते. सध्या जगभरात बदलाचे वारे वेगाने वाहत आहेत. यामध्ये ऑटोमेशन, डिजिटायझेशन, सेन्सर टेक्नॉलॉजी, थ्रीडी प्रिंटिंग, त्याचबरोबर व्हर्च्युअल रिॲलिटी, अग्युमेंटेड रिॲलिटी यांसारखे बदल मानवी आयुष्यावर चांगले अथवा वाईट प्रभाव टाकत आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मला अनेक जण एक प्रश्न नेहमी विचारतात, खासगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांकडून नेमक्या अपेक्षा काय असतात? खूप जणांचे वरिष्ठांशी पटत का नाही? खासगी कंपन्या पुनर्रचनेच्या नावाखाली कोणत्या कर्मचाऱ्यांना नारळ देतात? एका बाजूने कर्मचारी आमच्या ॲसेट आहेत असे सांगणे आणि दुसऱ्या बाजूने कर्मचाऱ्यांना अलगदपणे बाहेर का काढले जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच शब्दात दडलेली आहेत आणि ती म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांची संभाव्य उपयोगिता आणि त्या कर्मचाऱ्यांची सतत शिकण्याची प्रवृत्ती. कर्मचारी उपयुक्त नसेल, सतत शिकून स्वतःला उपयुक्त करत नसेल, तर त्या कर्मचाऱ्यांचा वरील यादीत पहिला क्रमांक लागतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही संभाव्य उपयोगिता कशी विकसित करावी, याबद्दल आपण पुढे बघू...

या सर्व बदलांचा प्रभाव आपल्या नोकरीवर नक्कीच होत आहे. कित्येक जॉब्स तंत्रज्ञानाच्या त्सुनामीत वाहून जात आहेत. सरकारी नोकरी आणि व्यवसाय थोडा आपण बाजूला ठेवू आणि खासगी क्षेत्रातील नोकरीबद्दल पाच अंगांनी विचार करू. 

आपण जर खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल,
तर ती टिकवायची कशी?
नोकरीचे रूपांतर दिमाखदार कारकिर्दीत कसे करावे?
कोणत्या परिस्थितीत नोकरी बदलणे गरजेचे आहे?
नोकरी बदलताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा?  
संस्था कोणतीही असो कारकीर्द 
कशी विकसित करावी?

(लेखक मनुष्यबळ विकास आणि व्यवस्थापनतज्ज्ञ असून, एका बहुराष्ट्रीय संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.)