esakal | रि-स्किलिंग : कंपनीत वैयक्तिक ब्रॅण्डिंग करताना... | Branding
sakal

बोलून बातमी शोधा

Branding
रि-स्किलिंग : कंपनीत वैयक्तिक ब्रॅण्डिंग करताना...

रि-स्किलिंग : कंपनीत वैयक्तिक ब्रॅण्डिंग करताना...

sakal_logo
By
विनोद बिडवाईक

‘तुम्ही जे काही करता ते संस्थेमध्ये लोकांना आणि वरिष्ठांना नक्कीच कळायला हवे,’ माझ्या एका मॅनेजरने मला माझ्या उमेदीच्या काळात हा सल्ला दिला होता. आपण आपले काम करतो आणि इतर लोक ते लक्षात घेऊन आपल्याला योग्य ते श्रेय देतील असे आपण गृहीत धरतो. परंतु, संस्थेतील गर्दीत उठून दिसणे सोपे नाही. नेहमी प्रकाशझोतात राहणे तसे खूप कठीण काम आहे. शिवाय आगावूपणाचा शिक्का बसणार नाही याची काळजी घेऊन गर्दीत उठून दिसणे सोपे नाही. स्वतःची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे हे स्पर्धेच्या जगात मात्र नेहमीच आवश्यक आणि फायद्याचे ठरते. ही सकारात्मक प्रतिमा वैयक्तिक ब्रँडिंगशिवाय (प्रतिमा) शक्य नाही.

बहुतेक कर्मचाऱ्यांमध्ये वैयक्तिक ब्रँडिंगचे कौशल्य नसते. वैयक्तिक ब्रँडिंग म्हणजे निव्वळ स्वतःचा ढोल वाजवणे नव्हे, त्यासाठी स्वतःची एक स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. तुमच्या वैयक्तिक ब्रँडिंगसाठी बरीच साधने उपलब्ध आहेत.

तुम्ही ब्रँडिंगबद्दल अगदी स्पष्ट असायला हवे. स्वतःचे ब्रॅण्डिंग करत असताना नेहमी स्वतःचा उदो उदो करणारा म्हणून शिक्का बसू शकतो. आपले ब्रॅंडिंग हे राजकारणी लोकांसारखे खालच्या दर्जाचे असून चालत नाही. स्वतःचा बडेजाव मिरवणारे, श्रेय लाटू पाहणारे कर्मचारी कोणालाच आवडत नाहीत. स्वतःला नेहमी प्रश्न विचारा, की नोकरीच्या बाजारात तुमची किंमत काय आहे? तुम्हाला कारकिर्दीत यशस्वी व्हायचे असल्यास तुम्हाला संस्थेत करिअरमध्ये प्रगती करावीच लागेल. जॉब मार्केटमध्ये योग्य संधी केव्हा आणि कशी मिळणार हा प्रश्न विचारायला हवा.

योगदान ओळखले जावे

संस्थेमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी करत असाल, पण तुमच्या बॉस किंवा वरिष्ठांना हे माहीत आहे का? हा कळीचा प्रश्न असतो. तुमचे व्यावसायिक योगदान हे दृश्यमान असावे हे खरे आहे, परंतु तुमचे योगदान उच्चस्तरावर ओळखले जाते का? बहुतेक वेळा बॉस स्वार्थी असतात, ते तुम्हाला ओळखू शकतात, ते तुम्हाला चांगली वेतनवाढदेखील देऊ शकतात, परंतु शेवटी श्रेय फक्त त्यांच्या टीम हाताळण्याच्या कौशल्याला जाते. एक लीडर म्हणून त्याला श्रेय मिळायला हवे, परंतु तुमच्या संस्थेकडे योग्य आणि ठोस मूल्यमापन यंत्रणा नसेल, तर तुम्हाला तुमच्या योगदानाचे योग्य श्रेय मिळणार नाही. यासाठी योग्य लोकांच्या संपर्कात राहाणे गरजेचे असते. लोकांशी सहानुभूती बाळगा आणि त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करा. मेल वापरण्याऐवजी, फिरा आणि चर्चा करा. तांत्रिकदृष्ट्या आंधळे होऊ नका. हे सर्व करत असताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, वैयक्तिक सकारात्मक प्रतिमा तयार करणे सोपे नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपल्यामध्ये काहीतरी आत (कन्टेन्ट) असायला हवे, नाहीतर हा सर्व फुगा कधीही फुटू शकतो. स्वतःच्या प्रतिमेचा फुगा होऊ देऊ नका. हे साध्य करणे तुम्हाला सुकर होण्यासाठीच्या टिप्स आपण पुढील भागात जाणून घेऊयात.

loading image
go to top