रि-स्किलिंग : नोकरदार नव्हे, भागीदार व्हा!

करिअरबद्दल माझा सल्ला विचारण्यासाठी मला माझ्या नेटवर्कमधील लोकांकडून अथवा मित्रांकडून भरपूर फोन येत असतात. त्यापैकी बहुतेक लोक ४५ ते ५० या वयोगटातील असतात.
Reskilling
ReskillingSakal

करिअरबद्दल माझा सल्ला विचारण्यासाठी मला माझ्या नेटवर्कमधील लोकांकडून अथवा मित्रांकडून भरपूर फोन येत असतात. त्यापैकी बहुतेक लोक ४५ ते ५० या वयोगटातील असतात. सध्या निर्माण झालेल्या कामातील असुरक्षिततेमुळे ते नवीन संधी शोधत आहेत. काही नवीन करिअरच्या शोधात आहेत. संस्थेच्या व्यवस्थापनाचा वयस्कर कर्मचाऱ्याबद्दल असलेल्या पूर्वग्रहामुळे, संस्थेमध्ये होणाऱ्या पुनर्रचनेत या लोकांचाच बळी जातो आहे.

भारत हा तरुणांचा देश आहे. २०२२पर्यंत भारतीयांचे सरासरी वय ३० वर्षे असेल, अशी अपेक्षा आहे. आज भारतात बेरोजगारीचा दर जवळपास ६ टक्के आहे. एका बाजूला जॉब मार्केटमध्ये येणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार खर्च वाढत आहे. खर्चाच्या मानाने या कर्मचाऱ्यांची उपयोगमूल्यता कमी होत आहे. (असे व्यवस्थापनाला वाटत आहे.)

खरतेर, ४५-५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्याकडे लक्ष दिलेले नाही. एकदा नोकरी मिळाली, की शिकणे थांबून जाते. संस्थासुद्धा जोपर्यंत गरज असते तोपर्यंत काम काढून घेते आणि भविष्यात आता कर्मचारी फारसे शिकू शकत नाही असे लक्षात आले, की त्याला काढून टाकते. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग व यंत्रमानव मानव संसाधनाची जागा घेत आहेत. ऑटोमेशनमुळे नोकऱ्या‍ जात आहेत, हे आपल्याला माहिती आहेच. लोकांचा कल आता ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याकडे आहे. एखादे घरगुती उत्पादन अथवा औद्योगिक उत्पादन खरेदी करायचे असेल तर, टीमबरोबर अथवा कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर खरेदी करण्याचा निर्णय संगणक किंवा इंटरनेटवर घेतला जातो. अशा परिस्थितीत आपल्याला विक्री व्यवस्थापकांची आवश्यकता आहे का? कदाचित नाही, आम्हाला विक्री व्यवस्थापकाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. हीच परिस्थिती या वयाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची सुद्धा आहे. एखादे स्किल आऊटडेटेड झाले असेल, तर नवीन स्किल आत्मसात न केल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना खराब कामगिरीच्या नावाखाली डच्चू देण्याचे प्रकार नवीन नाहीत. अर्थात, हे सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे.

आजकाल, व्यवसायात अथवा संस्थेत भागीदार (Business Partners) म्हणून भूमिका वठवणारे कर्मचारी हवे आहेत. हे कर्मचारी त्यांच्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेतच, सोबत त्यांचे नेतृत्वगुण सुद्धा मजबूत आहेत. आपल्या ज्ञानाच्या जोरावर एखादे काम, प्रकल्प तडीस नेण्याचे कौशल्य ह्या कर्मचाऱ्यांकडे असते.

भविष्यातील कौशल्ये शिका

नोकरीच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर भविष्यातील कौशल्ये आपल्याला शिकून घावी लागतील. डिजिटायझेशनच्या युगात वेगळ्या पद्धतीने काम करण्याच्या पद्धती शिकून घ्याव्या लागतील. उदा. काही वर्षांपूर्वी विक्री प्रतिनिधी ग्राहकाच्या दारी जाऊन आपले उत्पादन विकत असे. आता ते ऑनलाइन विकावे लागेल. आणि ते कसे विकायचे ह्याचे कौशल्य शिकून घ्यावे लागेल. सादरीकरणाचे कौशल्य शिकावे लागेल, तसेच डेटावर आधारित विक्री कशी करायची हे वेगळेच कौशल्य आत्मसात करावे लागेल.

अशी परिस्थिती प्रत्येकच जॉबमध्ये आहे. त्यामुळे वाढत्या वयातही जॉब टिकवायचा असेल, तर तुमच्या क्षेत्रात काय घडामोडी होत आहेत आणि भविष्यातील कौशल्ये कोणती आहेत हे आधी समजून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com