रि-स्किलिंग : समारोप करताना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Upskill and Reskill
रि-स्किलिंग : समारोप करताना...

रि-स्किलिंग : समारोप करताना...

रि-स्किलिंग या सदरात आपण वेगवेगळी कौशल्ये आतापर्यंत बघितली. ही सर्व कौशल्य सोपी वाटत असली तर आत्मसात करायला कठीण आहेत. तुमचे वेगळेपण हे तुमच्या ज्ञानातून दिसेलच, परंतु, संस्थेत आणि समाजात काही वेगळे करायचे असेल तर ही सर्व कौशल्ये जास्त आवश्यक आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे ते शिकायचे कसे?

शिकणे ही आजीवन प्रक्रिया आहे. आपण नेहमी निरीक्षण करून, अनुभवातून, वाचून किंवा इतरांचे ऐकून शिकत राहतो. शिक्षण थांबवणारी व्यक्ती जगात अप्रासंगिक ठरते; असे लोक जीवनात नेहमीच दुःख सहन करतात. काही लोक इतरांचे निरीक्षण करतात, वाचतात, अनुभवतात आणि ऐकतात, परंतु कधीही शिकत नाहीत. ते लोक अंघोळ करूनही कोरडेच राहतात. ते अभिप्राय घेतात, इतरांचे ऐकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करतात.

आपण शिकतो ते 3 मार्गाने

१) वास्तविक अनुभव - हा अनुभव वास्तविक काम केल्याने, एखादी गोष्ट अनुभवल्याने येतो. एखादी गोष्ट करताना आपण काहीतरी शिकत असतो. ७० टक्के शिक्षण/अनुभव केवळ येथे मिळतो.

२) निरीक्षण, प्रशिक्षक अथवा मार्गदर्शकाद्वारे - आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे, लोकांचे निरीक्षण करून आपण शिकत असतो. तसेच प्रशिक्षक अथवा मार्गदर्शक जे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करतात त्याद्वारे शिकत असतो. येथे आपण २० टक्के शिकतो.

३) कार्यशाळा - ट्रेनिंग अथवा कार्यशाळा करून वाचन करून आपण शिकत असतो. येथे आपण केवळ १० टक्के शिकतो.

म्हणून म्हटले जाते, शिकणे ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे अनुभवाच्या आधारे ज्ञान तयार केले जाते.

तुम्हाला कोणताही अनुभव आला, कोणतीही परिस्थिती आली की तुमच्या मनात तुमच्या अनुभवाच्या आधारावर पॅटर्न तयार होतो. आणि मग भूतकाळात घेतलेला अनुभव कमी येतो. प्रथमच परिस्थितींचा अनुभव घेणे, त्या परिस्थितींना प्रतिसाद देणे, व्यक्तीला योग्य वाटते त्या वर्तनाचे प्रदर्शन करणे म्हणून केव्हाही चांगले.

शिक्षणात अमूर्त संकल्पनांचे ग्रहण समाविष्ट आहे जे विविध परिस्थितींमध्ये लवचिकपणे लागू केले जाऊ शकते.

हे सर्व खालीलप्रमाणे घडते...

  • ठोस अनुभव : एक नवीन अनुभव किंवा आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे,

  • नवीन अनुभवाचे चिंतनशील निरीक्षण

  • अमूर्त संकल्पना : नवीन कल्पनेला जन्म देते किंवा विद्यमान अमूर्त संकल्पना (व्यक्ती त्यांच्या अनुभवातून शिकलेली असते) बदलते.

  • सक्रिय प्रयोग अथवा अंमलबजावणी : शिकणारा त्यांच्या शिकलेल्या कल्पना वास्तविक जगात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो.

जेव्हा एखादी व्यक्ती ह्या चार टप्प्यांच्या चक्रातून प्रगती करते तेव्हाच त्याचे शिक्षण प्रभावी होते...

  • व्यक्ती ठोस अनुभव घेतो,

  • त्या अनुभवाचे तो निरीक्षण करतो, त्यावर चिंतन करतो.

  • एखाद्या मूर्त अथवा अमूर्त संकल्पनांचे विश्लेषण आणि ती संकल्पना कशी वापरता येईल ह्याचा विचार करतो.

  • भविष्यातील येणाऱ्या परिस्थितींमध्ये गृहितकांची चाचणी घेतो आणि नवीन अनुभवला तयार होतो.

मला आशा आहे, की ह्या सर्व कसोट्या आपण पूर्ण करून भविष्यातील आवाहनाला सामोरे जाल.

(समाप्त)

टॅग्स :educationVinod Bidwaik