संधी करिअरच्या... : झेपणारी शाखा निवडा...

विवेक वेलणकर
Wednesday, 20 January 2021

पालक आणि विद्यार्थी यांच्यापुढील यक्षप्रश्न म्हणजे दहावीचे वर्ष संपताना कोणती शाखा निवडावी हा असतो आणि ते बरेचदा ही निवड दहावीच्या गुणांच्या आधारे किंवा मित्र-मैत्रिणी काय म्हणतात याआधारे केली जाते, हे आपण पाहिले. हे दोन्हीही मार्ग अशास्त्रीय आहेत. शास्त्रीय मार्ग म्हणजे, विद्यार्थ्याने दहावीपर्यंत शिकलेले विषय कागदावर लिहून काढावेत आणि त्याचे तीन भाग करावेत.

पालक आणि विद्यार्थी यांच्यापुढील यक्षप्रश्न म्हणजे दहावीचे वर्ष संपताना कोणती शाखा निवडावी हा असतो आणि ते बरेचदा ही निवड दहावीच्या गुणांच्या आधारे किंवा मित्र-मैत्रिणी काय म्हणतात याआधारे केली जाते, हे आपण पाहिले. हे दोन्हीही मार्ग अशास्त्रीय आहेत. शास्त्रीय मार्ग म्हणजे, विद्यार्थ्याने दहावीपर्यंत शिकलेले विषय कागदावर लिहून काढावेत आणि त्याचे तीन भाग करावेत. पहिल्या भागात खूप आवडलेले/जमलेले/ झेपलेले विषय, दुसऱ्या भागात मध्यम आणि तिसऱ्या भागात अजिबात न विषय असे विभाजन करावे आणि मग तिसऱ्या भागात येणाऱ्या विषयांचा समावेश असलेली शाखा निवडणे टाळावे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या भागात लिहिलेल्या विषयांचा समावेश असलेली शाखा निवडावी. दुर्दैवाने, आपल्याकडे समज असा आहे की, फक्त सायन्स शाखेतूनच करिअरचे भरपूर पर्याय उपलब्ध होतात आणि म्हणून किमान अकरावी, बारावीत तरी सायन्स शाखा निवडावी आणि मग बारावीनंतर पाहिजे तर कॉमर्स किंवा आर्ट्स शाखा निवडता येईल. खरेतर विद्यार्थ्याला स्वतःला नक्की माहिती असते, की आपल्याला फिजिक्स हा विषय फारसा आवडत नाही आणि झेपतही नाही. मात्र, हे स्पष्टपणे न बोलल्याने विद्यार्थी सायन्स शाखा निवडतो आणि मग अकरावी बारावीत फिजिक्स न झेपल्याने तो आत्मविश्वासच हरवून बसतो. 

हे पर्याय आहेत...
दहावीनंतर सायन्स/ कॉमर्स/ आर्टस् अशा कोणत्याही शाखेची निवड केली तरी चालू शकते. फाईन आर्टस् , फॅशन/ इंटिरियर डिझाइन , कायदा, हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए, बीसीए, बीबीएम, एमबीए,डिफेन्स , पत्रकारिता ,स्पर्धा परीक्षा, बॅंकिंग, विमा, ट्रॅव्हल/टुरिझम, सेल्स/ मार्केटिंग, हार्डवेअर/नेटवर्किंग, ऍनिमेशन, बीपीओ/ कॉल सेंटर , अर्थशास्त्र, गणित/संख्याशास्त्र.
(लेखक करिअर क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vivek Velankar Writes about Career Opportunity