दहावीनंतर शाखा निवडताना...

७५-८० टक्के गुण मिळाल्यास विज्ञान शाखा, ७०-८० टक्के मिळाल्यास वाणिज्य आणि त्याहून कमी मिळाल्यास कला, होम सायन्स, आयटीआयची निवड
Vivek Welankar writes what student should do during opting for stream arts commerce science diploma engineering iti
Vivek Welankar writes what student should do during opting for stream arts commerce science diploma engineering itisakal
Summary

७५-८० टक्के गुण मिळाल्यास विज्ञान शाखा, ७०-८० टक्के मिळाल्यास वाणिज्य आणि त्याहून कमी मिळाल्यास कला, होम सायन्स, आयटीआयची निवड

दहावीचं निम्मं वर्ष सरल्यावर पालक आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात दहावीनंतर पुढे काय करायचे याचे. अजूनही अनेक पालक, विद्यार्थी हा निर्णय दहावीला किती गुण मिळाले यावर घेतात. मग ७५-८० टक्के गुण मिळाल्यास विज्ञान शाखा, ७०-८० टक्के मिळाल्यास वाणिज्य आणि त्याहून कमी मिळाल्यास कला, होम सायन्स, आयटीआयची निवड केली जाते. दहावीला घोकंपट्टी, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव यांमुळेही चांगले गुण मिळू शकतात आणि शाखानिवड चुकते. केवळ ऐंशी टक्के मार्क मिळाले म्हणून शास्त्र शाखेत प्रवेश घेणे योग्य नाही, मात्र अनेकदा इतके चांगले मार्क मिळालेत तेथेच प्रवेश घेण्याचे दडपण पालक, शिक्षक, नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी यांच्याकडून आणले जाते. मात्र, पाय पक्का नसल्याने अकरावी, बारावी जड जाऊ शकते. मिळालेले मार्क, विषयांचे परिपूर्ण आकलन व आवड यांचा थेट संबंध असतोच असे नाही.

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की विद्यार्थ्यांना स्वतःला मनातून नक्की माहिती असते दहावीपर्यंत आपल्याला कुठले विषय आवडले, समजले, झेपले आणि कुठले विषय आवडले नाहीत, समजले नाहीत, झेपले नाहीत. आपण कोणत्या विषयात न समजता रेटून पाठांतराच्या जोरावर मार्क मिळवले आहेत. फक्त ही गोष्ट उघड बोलून दाखवण्याचे धाडस ते करू शकत नाहीत आणि त्या विषयात उत्तम मार्क मिळाल्यावर तर नाहीच नाही! आणि मग मार्कांच्या आधारे निर्णय घेतला जातो. अजून एका प्रकारे विद्यार्थी दहावीनंतर शाखा निवडीचा निर्णय करतात, तो म्हणजे आपले जवळचे मित्र-मैत्रिणी जी शाखा निवडतात, तीच शाखा आपण निवडायची. ही अत्यंत अशास्त्रीय पद्धत आहे आणि यापद्धतीने घेतलेला निर्णय अनेकदा चुकतोच. दर वर्षी अशा शेकडो केसेस अकरावी, बारावीनंतर माझ्याकडे येतात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि आयुष्यातील मोलाचा वेळ वाया जातो. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे, की मार्क किती मिळाले याआधारे किंवा मित्र-मैत्रिणी काय निवड करतात या आधारे दहावीनंतर शाखा निवड करणे अशास्त्रीय व धोक्याचे आहे.

दहावीनंतरच्या वाटा...

निकालाचे वेध आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही लागले आहेत. शैक्षणिक जीवनातील दहावीचा टप्पा हा महत्त्वाचा मानला जातो. करिअरबाबत याच वर्षी निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात संधी आहे, याचा घेतलेला आढावा..

उच्च माध्यमिक शिक्षण (बारावी)

आर्ट्स

  • विधी (पाच वर्ष)

  • बीए (तीन वर्ष)

  • बीए बीएड (चार वर्ष)

  • बीए (लिबरल आर्ट्स)

  • बीबीए

  • बीबीएम

कॉमर्स

  • विधी (पाच वर्ष)

  • बीकॉम (तीन वर्ष)

  • बीबीएम

व्यावसायिक संस्थांचे खालील अभ्यासक्रम

  • आयसीडब्ल्यूए

  • सीए आदी

  • पदविका अभ्यासक्रम

  • अभियांत्रिकी-तंत्रज्ञान शिक्षणातील पदविका

  • प्रमाणपत्र अभ्यासक्रम

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर (आयटीआय)

सायन्स

  • अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष

  • अभियांत्रिकी पदविका थेट दुसऱ्या वर्षास प्रवेश

  • फार्मसी पदविका/ पदवी

  • आर्किटेक्चर

  • मेडिकल

  • पशुवैद्यकीय शिक्षण

  • बीएस्सी

  • बीएस्सी (ॲग्री)

  • बी-प्लॅनिंग (४ वर्षे)

  • बी-डिझाईन (४ वर्षे)

  • हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग

  • बीएस्सी बीएड (४ वर्षे)

फाईन आर्ट्स

  • विधी (५ वर्षे)

  • बी-अप्लाईड आर्ट्स अँड क्राफ्ट

  • बीबीए

  • बीबीएम

  • बीएस्सी (ॲनिमेशन)

  • बीएस्सी (ब्लेंडेड) व इत्यादी

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर (Industrial Training Institute)

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालय, महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त शासकीय व खासगी ओद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील व्यवसायांचे कौशल्य शिकवणारे प्रशिक्षण हे रोजगार व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरतात.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्पकारागीर दहावीनंतरचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत.

एकूण ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण.

एक ते दोन वर्षे कालावधी.

प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होतो.

मेहनती विद्यार्थ्यांपुढे अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शिक्षणातील पदविका/पदवी अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने करू शकतात.

वेबसाईट : https://admission.dvet.gov.in

* अभियांत्रिकी / तंत्रज्ञान शिक्षणातील पदविका (Diploma in Engineering/Technology)

तंत्रशिक्षण संचालनालय (DTE), महाराष्ट्र राज्य अधिपत्याखालील अभियांत्रिकी / तंत्रज्ञान शिक्षणातील पदविका अभ्यासक्रम शास्त्र व तंत्रज्ञान युगामध्ये नोकरी व स्वयं रोजगारासाठी आजही तेवढेच प्रभावी ठरत आहेत.

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शिक्षणातील पदविका अभ्यासक्रम शासकीय व खाजगी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध.

तीन वर्षे कालावधी.

कनिष्ठ अभियंता म्हणून करिअर सुरवात होते.

पुढे थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी / तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.

वेबसाईट : http://www.dtemaharashtra.gov.in

- राजेश ओहोळ, करिअर समुपदेशक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com