कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गुणवत्तेचं काय?

आपण इंटरनेटवर एखादा सुंदर फोटो पाहतो, आकर्षक व्हिडिओ पाहतो किंवा एखादा भन्नाट लेख वाचतो आणि क्षणात तो खरा आहे असे गृहीत धरतो.
What About the Quality of Artificial Intelligence

What About the Quality of Artificial Intelligence

sakal

Updated on

- प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर

आपण इंटरनेटवर एखादा सुंदर फोटो पाहतो, आकर्षक व्हिडिओ पाहतो किंवा एखादा भन्नाट लेख वाचतो आणि क्षणात तो खरा आहे असे गृहीत धरतो. परंतु आता एक नवीन प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे; हे खरंच माणसाने तयार केले आहे का?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आज काही सेकंदांत फोटो, व्हिडिओ, आवाज, बातम्या, कविता आणि सोशल मीडिया पोस्ट तयार करता येतात. या क्षमतेने डिजिटल जगाला प्रचंड वेग दिला आहे. परंतु याचबरोबर इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कमी दर्जाच्या, पुनरावृत्ती असलेल्या किंवा केवळ लक्ष वेधण्यासाठी तयार केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेतील कंटेंटसाठी एक नवा शब्द लोकप्रिय झाला आहे; ‘एआय स्लॉप’.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com