esakal | दहावी नंतर करिअर फक्त 'कसे निवडावे' नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal-Disha-Design-960---540 (1).jpg

दिशा ऍकॅडमी वाई यांच्या संयुक्त विद्यमाने "दहावीनंतर काय?' याविषयावर विनामूल्य वेबिनार रविवार दिनांक 21 जून रोजी, सकाळी 11 वाजता Zoom App वर (झूम ऍपवर) घेण्यात येणार आहे. यात वाईच्या दिशा ऍकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम सर मार्गदर्शन करतील. इच्छुकांनी 7775925923 / 7775024445 या फोन नंबर संपर्क साधावा. 

दहावी नंतर करिअर फक्त 'कसे निवडावे' नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

10 वी परीक्षेनंतर मिळालेल्या मार्कांवरून आर्टस्‌, कॉमर्स, सायन्स शाखेची निवड करण्याकडे पालक व विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. करिअर घडविताना पाल्याचे अंगीभूत गुण व क्षमतांचा विचार करायला हवा, हा विचार गेल्या काही वर्षांत रुजू लागला आहे. सुजाण पालकत्वाची ही भूमिका अधिक समृद्ध करण्यासाठी वाईतील दिशा ऍकॅडमी सातत्याने प्रयत्न करते. कोरोनाच्या संकट काळात सुरू होणारे नवे शैक्षणिक वर्ष, पालकांच्या मनातील शंका; मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्‍चर, डिफेन्स या क्षेत्रात करिअर, अशा अनेक पैलूवर प्रकाश टाकण्यासाठी सकाळ आणि दिशा ऍकॅडमी वाई यांच्या संयुक्त विद्यमाने "दहावीनंतर काय?' याविषयावर विनामूल्य वेबिनार रविवार दिनांक 21 जून रोजी, सकाळी 11 वाजता Zoom App वर (झूम ऍपवर) घेण्यात येणार आहे. यात वाईच्या दिशा ऍकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम सर मार्गदर्शन करतील. करिअर मार्गदर्शन वेबिनार तीन भागांत होणार असून, दुसऱ्या भागात इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्‍चर, डिफेन्स कोर्सच्या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी महत्त्वाच्या बाबी कोणत्या? कोविड- 19 मुळे असणाऱ्या टाळेबंदीचा या परीक्षांच्या तयारीवर काय परिणाम होऊ शकतो, या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. सदर मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्‍यक असून, इच्छुकांनी 7775925923 / 7775024445 या फोन नंबर संपर्क साधावा. 


सातत्याने यशाची परंपरा उंचावत नेणारी वाईतील दिशा ऍकॅडमी सायन्स शाखेतील विविध स्पर्धा परीक्षांची सर्व्वोत्तम तयारी करून घेते. सर्व अत्याधुनिक सोईसुविधा, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक, मेस, हॉस्टेल सुविधा, शहरातल्या गर्दीपासून दूर, अभ्यासावर लक्ष केंद्रात करता येईल, असे वातावरण आणि ऑनलाइन पद्धतीने शिकता येईल, असे काटेकोर नियोजन करून सोशल डिस्टन्सिंग, आरोग्य व सुरक्षेच्या सर्व मानदंडाचे पालन यावर दिशा ऍकॅडमीने भर दिलेला आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थिती विद्यार्थी मित्रांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. 
कोरोना संकटाच्या सावटाखाली जग असताना दहावीनंतर करिअरची निवड कशी करावी? करिअरची निवड करताना Aptitude Test चे काय महत्त्व, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्‍चर, डिफेन्स कोर्सच्या परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, कॉलेजेस व ब्रॅंचेस या विषयी सविस्तर माहिती देणारा वेबिनार समाजाच्या बदलत्या गरजा आणि करिअरच्या संधी सोपेपणाने समजावून सांगेल.