काय आहे भारताची नवीन शिक्षण पद्धती

हेरंब कुलकर्णी
Thursday, 21 November 2019

नवीन भारतीय शिक्षणपद्धतीचा विचार करताना आपण मागील लेखांमध्ये शिक्षण पद्धतीची बदलावयाची रचना या विषयाचा विचार केला. शिक्षणाची प्रथम पाच वर्षे, नंतर तीन वर्षे, पुन्हा तीन वर्षांचा टप्पा आणि शेवटी चार वर्षाचे उच्च माध्यमिक शिक्षण अशा प्रकारची ही रचना आपण मागील लेखात काही प्रमाणात कशी असेल याचा अंदाज घेतला.

जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलंड
नवीन भारतीय शिक्षणपद्धतीचा विचार करताना आपण मागील लेखांमध्ये शिक्षण पद्धतीची बदलावयाची रचना या विषयाचा विचार केला. शिक्षणाची प्रथम पाच वर्षे, नंतर तीन वर्षे, पुन्हा तीन वर्षांचा टप्पा आणि शेवटी चार वर्षाचे उच्च माध्यमिक शिक्षण अशा प्रकारची ही रचना आपण मागील लेखात काही प्रमाणात कशी असेल याचा अंदाज घेतला.

भारतातील  शिक्षणपद्धती.....

अशा प्रकारची रचना करण्यामागचा उद्देश मूलतः शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या मेंदूचा पूर्ण विकास होतो, दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने औपचारिक शिक्षणासाठी शारीरिक आणि मानसिकरीत्या तयार केले जाते, तिसऱ्या टप्प्यात औपचारिक शिक्षणाला सुरुवात आणि त्यात स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या वापरायला उद्युक्त केले जाते, विशिष्ट साध्य साध्य करण्यासाठी प्रयत्नशील बनवले जाते आणि चौथ्या व अंतिम टप्प्यामध्ये नववी ते बारावी या टप्प्याचा विचार करताना एकमेकांवर आधारित विषय अधिक सखोल विचार व कृतीतून शिक्षण अशी ध्येय साकार करण्यासाठी त्यांना प्रयत्नशील केले जाते. या उद्दिष्टांमुळे अशा प्रकारची रचना करण्यात यावी असा विचार या बदललेल्या शैक्षणिक धोरणात मांडलेला आढळतो. 

या प्रत्येक टप्प्याच्या अंति एक एक परीक्षा राज्यपातळीवर किंवा देशपातळीवर घेतल्या जाव्यात असाही सध्याच्या नीतीमध्ये उल्लेख केलेला आढळतो. ही पद्धती चांगली किंवा वाईट यावर अनेकांनी ऊहापोह केलेला आपल्याला दृष्टीस पडेल. भारताने शिक्षण क्षेत्रात टाकलेले प्रगतीचे नवीन पाऊल म्हणजे शिक्षक गुणवत्तेवर भर देण्यासाठी भारत या शैक्षणिक धोरणापासून अधिक आग्रही झालेला दिसतो. शिक्षक प्रोत्साहनपर अनेक नवीन धोरणे योजना ही नवी शिक्षा पद्धती घेऊन येणार आहे.

भारताच्या सद्यःस्थितीतील नवीन शैक्षणिक धोरणाबाबत बाबतीत अनेक गोष्टी या अत्यंत उत्तम रीतीने मांडल्या गेल्या आहेत. शिक्षण पद्धतीला पूरक असेच घटक या नीतीत हाताळण्यात आलेले आढळतात. परंतु ही प्रत्यक्ष प्रक्रिया घडून येण्यामध्ये हे अतिघाई करून चालणार नाही आज वटवृक्षाची बी लावल्यावर लगेच त्या वडाचे झाड होऊन त्याला पारंब्या फुटतील अशी अपेक्षा करणे योग्य नाही. शैक्षणिक विकासाची ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने हळूहळू अधिक चांगले यश संपादन करील अशी आशा वाटते त्यामुळे एकूणच भारताच्या सद्यःस्थितीतील नवीन निर्णयांचे कौतुकच करावेसे वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is Indias new teaching method