
प्रांजल गुंदेशा
आपण एका दिवसात काय करू शकतो, याचा विचार आपण वरचेवर बऱ्याचदा करत असतो. मात्र, आपण वर्षभरात काय काय करू शकतो, याचा विचार फारसा केला जात नाही. प्राधान्यक्रम न ठरविणे, वेळ वाया घालविणे अशा अनेक गोष्टी यामागे आहेत. मात्र, तुम्हाला तुमचे स्वप्न, ध्येय पूर्ण करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला वेळेला अनन्यसाधारण महत्त्व द्यावं लागेल आणि त्यासाठी वर्षाचं नियोजन आखावं लागेल. असं म्हटलं जातं की, जेव्हा आपण योजना आखण्यात अपयशी होतो, तेव्हा आपण एका अर्थाने अपयशी होण्याचे नियोजन करत असतो. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे ठरते.