
2024 पर्यंत 'या' कंपनीत असतील 50 टक्के महिला कर्मचारी!
महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. नोकरीतही त्या आपले काम चांगलं करून कतृत्व सिद्ध करत आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये महिला उच्च पदावर काम करत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे अनेक ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळेच की काय काही कंपन्या महिलांबरोबर काम करण्यास जास्त उत्सुक आहेत. ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड (BIL), फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. येत्या 2024 पर्यंत त्यांच्या कारखान्यातील कामगारांमध्ये महिलांचा वाटा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या कंपनीत 38 टक्के महिला कार्यरत असल्याचे कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर (सीएमओ) अमित दोशी यांनी सांगितले.
हेही वाचा: महिलांनो, Weight Loss करताय! 'ही' तीन डाएट्स करताना करा विचार
गुगलसोबत करार
कंपनीने ई-कॉमर्स, डिजिटल सेवा, मोबाईल व्हॅनद्वारे नेत्रचिकित्सा काळजी आणि बालशिक्षण यांसारख्या क्षेत्रात स्टार्ट अपसाठी 30 महिला उद्योजकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रारंभिक फंड दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. कंपनीने देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण (skill training) देण्यासाठी गुगलशीही करार केल्याची माहिती दोशींनी दिली.
हेही वाचा: Mumbai Metro Job : इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, लवकर करा अर्ज
ब्रिटानियाच्या गुवाहाटी कारखान्यात महिला कामगारांचे प्रमाण 60 टक्के असून ते 65 टक्के करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी तसेच पॅकिंग, हाउसकीपिंग, लॅब टेस्टिंग, कॅन्टीन आणि सुरक्षा यासारख्या सामान्यत: पुरुष प्रधान क्षेत्रांमध्ये महिला कर्मचारी आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याचेही दोशी म्हणाले. महिलांना सक्षम करण्यासाठी कंपनीने महिला उद्योजकांमध्ये स्टार्ट-अप आव्हान (start-up challenge) सुरू केले आहे.