जगभरातील ज्ञान देणारे विद्यापीठ : ऑक्सफर्ड

‘द लॉर्ड इज माय लाइट’ या ब्रीदवाक्यासारखेच इथले कामकाज व अभ्यासक्रम विद्यापीठाची ज्ञानज्योत पदोपदी तेजोमय करताना दिसते.
university Oxford
university OxfordSakal
Summary

‘द लॉर्ड इज माय लाइट’ या ब्रीदवाक्यासारखेच इथले कामकाज व अभ्यासक्रम विद्यापीठाची ज्ञानज्योत पदोपदी तेजोमय करताना दिसते.

- ॲड. प्रवीण निकम

जुनी देखणी इमारत, अंतर्गत दर्जेदार रचना, मोठे रिसर्च हब, अनोखा शैक्षणिक अभ्यासक्रम आणि शिक्षण आणि संशोधनाला जोडणारा सुंदर धागा म्हणजे सर्वांत प्राचीन असलेले हे जगविख्यात असे ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ.’ ‘द लॉर्ड इज माय लाइट’ या ब्रीदवाक्यासारखेच इथले कामकाज व अभ्यासक्रम विद्यापीठाची ज्ञानज्योत पदोपदी तेजोमय करताना दिसते.

या भागात आपण त्यातील प्रवेश प्रक्रियेविषयी जाणून घेणार आहोत. या विद्यापीठात विविध विषयांमध्ये ३५०हून अधिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. काळ बदलतो त्यानुसार विद्यापीठ अभ्यासक्रम अपडेट करत असते. विद्यापीठात ह्युमॅनिटीज, मॅथेमॅटिकल, फिजिकल अ‍ॅण्ड लाइफ सायन्सेस, मेडिकल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस या चार प्रमुख विभागांमार्फत संस्थेतील सर्व पदवी व पदव्युत्तर, संशोधन विभाग चालतात.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या http://www.ox.ac.uk या संकेतस्थळावर विविध विभागाद्वारे आयोजित केलेल्या अभ्यासक्रमांची अद्ययावत यादी उपलब्ध आहे. कोर्सबद्दल सखोल माहिती आणि त्यासाठी नेमका अर्ज कसा करावा, त्या विषयातील कोर्ससाठी कोणकोणत्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत आणि त्याची अर्जप्रक्रिया काय आहे अशा सर्व बारीकसारीक गोष्टींची माहिती अधिक मुद्देसूद आणि तपशीलवार उपलब्ध आहे. साधारण ही प्रवेशप्रक्रिया पुढील साखळीनुसार चालते.

UCAS APPLICATION - TESTS - WRITTEN WORK- INTERVIEWS- DECISIONS

ही संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. यंदाची प्रवेशप्रक्रिया जूनपासून सुरू होणार आहे. या विद्यापीठाचे विशेष म्हणजे विविध संस्थांशी संलग्न शिष्यवृत्तीसह ऑक्सफर्ड विद्यापीठ आपल्या केंद्रीय व्यवस्थापनातून काही निधी राखून विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ शिष्यवृत्तीही देते. सर्व शिष्यवृत्तींची माहिती ही त्या-त्या अभ्यासक्रमाच्या वेबपेजवर उपलब्ध आहे.

ऑक्सफर्डमध्ये प्रवेश निश्चित झाला, की पदवीधर विद्यार्थी म्हणून ज्या विभागाचे किंवा विद्याशाखेशी संबंधित असाल व ज्या विषयात अधिक ज्ञान वाढवण्यासाठी इच्छा असल्यास तुम्हाला विद्यापीठातील विभागामार्फत तुमच्या प्राध्यापकांव्यतिरिक्त एक समन्वयक, त्याचबरोबर एक पर्यवेक्षक दिला जातो. जेणेकरून, तुम्हाला संपूर्ण कोर्समध्ये, तुमच्या विषयातील, क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल, यासाठी हा अनोखा प्रयत्न असतो. पदोपदी मार्गदर्शन करण्यासाठी आणि विविध शंकांचे निरसन करण्याकरिता या गोष्टींची बरीच मदत होते.

अद्ययावत असे ग्रंथालय येथे आहे. जगभरातील महत्त्वाच्या संशोधनासाठी, महत्त्वाचे असणारे दस्तावेज, संशोधन पेपर्स, पुस्तके हे डिजिटल स्वरूपात येथे उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्हाला तुमचा विशिष्ट विद्यार्थी आयडी आणि पासवर्ड दिला जातो. ज्यामार्फत तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा विद्यापीठातील कॉम्प्युटर्समध्ये हे सर्व डिजिटल दस्तावेज हव्या त्या क्षणाला ॲक्सेस करू शकता.

याचबरोबर ५००-६०० वर्षांपेक्षा जुनी अशी ऑक्सफर्ड प्रेस ही विद्यापीठाची स्वतंत्र प्रेस येथे आहे. या प्रेसमार्फत विद्यार्थ्यांचे, प्राध्यापकांचे आणि संशोधकांचे विविध महत्त्वाचे अभ्यास, इतर काही उपयुक्त शैक्षणिक अभ्यासक्रम प्रकाशित केले जातात. यामुळे या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांसाठी आपला महत्त्वाचा अभ्यास जगाला दिशा देणारा असल्यास तो या प्रेसमध्ये प्रकाशित करणे अधिक सोपे जाते.

पुढील भागात आपण याच विद्यापीठातील सर्वांत जास्त नावाजलेले आणि भारतीयांसाठी महत्त्वाचे वाटणारे दोन अभ्यासक्रम म्हणजे, ‘मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी’ आणि पत्रकारांसाठी महत्त्वाची असणारी ‘ऑक्सफर्ड-रॉयटर्स (Oxford-Reuters) जर्नालिस्ट फेलोशिप’ या विषयी जाणून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com