YCMOU Exams | 'मुक्त'च्या हिवाळी सत्र परीक्षा डिसेंबरपासून; विद्यापिठातर्फे सूचना जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam

YCMOU Exams | 'मुक्त'च्या हिवाळी सत्र परीक्षा डिसेंबरपासून

नाशिक : राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) हिवाळी सत्र परीक्षा डिसेंबरपासून घेतल्‍या जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता होणाऱ्या या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत टप्‍याटप्‍याने पार पडतील. विद्यापीठाच्‍या अधिकार मंडळाने घेतलेल्‍या निर्णयानुसार सर्व शिक्षणक्रमांच्‍या सर्व सत्रांच्‍या परीक्षा एकाच वेळी घेतल्‍या जाणार आहेत.

मुक्‍त विद्यापीठातर्फे यासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे. त्‍यानुसार विद्यापीठाच्‍या हिवाळी सत्र लेखी आणि पुनर्परीक्षा डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्‍यान घेतल्‍या जाणार आहेत. सर्व शिक्षणक्रमांच्‍या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांच्‍या प्रथम, तृतीय, पाचवे आणि सातव्‍या सत्राची लेखी परीक्षा होईल. तसेच सर्व शिक्षणक्रमांच्‍या पुर्नपरीक्षार्थी (रिपिटर) विद्यार्थ्यांची सर्व सत्रांच्‍या लेखी परीक्षा (पुनर्परीक्षा) या कालावधीत घेतल्‍या जाणार आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सर्व शिक्षणक्रमाच्‍या वार्षिक परीक्षेच्‍या लेखी पुनर्परीक्षा होईल. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २० नोव्‍हेंबरपर्यंत असणार आहे. यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत प्रती परीक्षा शंभर रुपये इतक्‍या विलंब शुल्‍कासह परीक्षा अर्ज भरता येईल. विविध पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा नोंदणी कालावधी संपलेल्‍या विद्यार्थ्यांना पुर्ननोंदणी अर्ज परीक्षा अर्जातच संबंधित पोर्टलवर करायचा आहे.


हेही वाचा: Diwali 2021 : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी करा डिजिटल सोनं

परीक्षेच्‍या स्‍वरुपाची घोषणा नाही

विद्यापीठाने परीक्षेच्‍या स्‍वरुपाची घोषणा अद्याप केलेली नाही. ऑनलाइन अथवा ऑफलाईन पद्धतीने विद्यापीठ निर्णयानुसार ही परीक्षा घेतली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. परीक्षा आयोजनाबाबत आणि परीक्षेचे स्‍वरुप, कार्यपद्धती याबाबत सविस्‍तर कळविले जाणार आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रकही अथावकाश जारी केले जाईल, असेही सूचनापत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा: Nokia चा पहिला टॅबलेट T20 भारतात लॉंच, पाहा किंमत आणि फीचर्स

Web Title: Ycm Open University Winter Session Examinations Will Be Held From December

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Open UniversityYCMOU