
भोर: विधानसभा निवडणूकीसाठी २०३ भोर विधानसभा मतदारसंघात २३ उमेदवारांनी ३१ अर्ज दाखल केले असून मंगळवारी (ता.२९) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विकास खरात यांनी आणि साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र नजन यांनी दिली.