
अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघात गेल्या पस्तीस वर्षांपासून काँग्रेसचे ॲड. के. सी. पाडवी आमदार आहेत. त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर विरोधात महायुतीचे उमेदवार व शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदचे विद्यमान आमदार आमश्या पाडवी, भारत आदिवासी पार्टीकडून ॲड. पद्माकर वळवी, भाजपच्या बंडखोर माजी खासदार डॉ.हीना गावित अपक्ष उमेदवारी करीत आहे. तर अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा, सुशीलकुमार पावरा यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत.