
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदाच्या 2024 निवडणुकीत तिरंगी लढत रंगली आहे. भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील ही चुरशीची लढत मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपाचे रणधीर सावरकर, ठाकरे गटाचे गोपाल दातकर, आणि वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने हे प्रमुख उमेदवार रिंगणात होते. या तरंगी लढतीती भाजपाचे रणधीर सावरकर विजयी झाले आहेत.
त्यांना एक लाख 8 हजार 619 मते मिळाली आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांना 58 हजार 006 मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांना पन्नास हजार 681 मते मिळाली आहेत. रणधीर सावरकर यांचा 50 हजार 613 मतांनी विजयी झाले.