

जम्मू काश्मीर अन् हरियानाच्या विधानसभा निवडणूकांचा निकाल पार पडला.. दोन्ही राज्यात ९० जागांसाठी निवडणुका होत्या... जम्मू काश्मीर पेक्षा हरियानाचे निकाल चांगलेच चर्चेत राहिले... एक्झिट पोल...राजकीय विश्लेषक सगळ्यांचे अंदाज फेल ठरले... भाजपनेही अपेक्षीत नसलेला विजय संपादन केला
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली... काँग्रेसने सुरुवातीला ६५ चा लीड घेतला दहा ते साडेदहा पर्यंत हा आकडा स्थिर होता, त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी उत्साहात मिठाईचे दुकान गाठले...मात्र साडेदहा नंतर भाजपने मुसंडी मारली, त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी मिठाई घेण्याचे थांबवले...भाजप जवळपास ८ ते १० जागांनी पुढं जात होती. एकंदरीत काटे की टक्कर सुरु होती...
पण नंतर हे निकाल वनसाईड झाले अन् भाजपाने मोठी मुसंडी मारली...ही मुसंडी एवढी जोरात होती की याचे धक्के पार महाराष्ट्र काँग्रेसला बसले...कारण आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हरियानाचा निकाल महाराष्ट्रासाठी इशारा होता...फडणवीस म्हणतात तसं महाराष्ट्र खरंच दुसरी सलामी देणार की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार? हे पाहणे महत्वाचे आहेत....पण या हरियाना निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम झाले किंवा होईल हे समजून घेऊया...
लोकसभा निवडणुकीत ९९ जागांवर विजय मिळवलेली काँग्रेस एका निवडणुकीने थोडीशी बॅकफुटवर गेली... महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेला आघाडीचा प्रश्न अधिक गडबडीत जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी होण्याची शक्यता असून काँग्रेसला आता त्यांच्या मित्र पक्षांशी अधिक सावधपणे वाटाघाटी कराव्या लागतील.
महाराष्ट्र काँग्रेस प्रादेशिक पक्ष आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला फरक पडणार नाही. पण काँग्रेसचे मनोबल खचले. याचा फायदा भाजप महाराष्ट्रात याचा चांगला करुन घेईल, तिघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्यासाठी पक्ष फुटीनंतर पहिली मोठी लढाई आहे. यापूर्वी लोकसभेत भाजपाला फटका बसला. त्यामुळे बदला घेण्याची संधी देखील भाजपला आहे. लाडकी बहीण योजना देखील टर्निंग पॉईंट ठरू शकते.
1) राज्याती दोन्ही आघाड्यांच्या जागा वाटपावर फक्त बैठका सुरु आहेत त्यातून येणाऱ्या नाराजीच्या बातम्या आता थांबू शकतात. हरियाना अन् जम्मू काश्मीर निकालाने महाविकास आघाडी अन् महायुतीच्या जागा वाटपावर परिणाम होऊ शकतात. महायुतीत भाजपची ताकद वाढली...तर महाविकास आघाडीत काँग्रेस बॅकफूटवर गेली...त्यामुळे राज्यात काँग्रेसला रणनीती बदलावी लागू शकते.
2) भाजपने हरियाना निवडणुकीचा महाराष्ट्रभर जल्लोष केला. ही विधानसभेची वातावरण निर्मिती होती...हरियानात भाजप हरणार हीच चर्चा सगळीकडे होती पण भाजपची पडद्यामागे सूक्ष्म नियोजन केलं. त्याचा मोठा फायदा झाला. हाच पॅटर्न भाजप महाराष्ट्रात राबवू शकतो.
3) हरियाना निकालानंतर शरद पवार-उद्धव ठाकरे आता जास्त जागांची मागणी करू शकतात. त्यामुळे काँग्रेसची देखील गोची होणार... तर भाजप एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटासमोर आपली कॉलर टाईट ठेवणार आहे.
4) महाराष्ट्रात पक्षांची खिचडी आहे त्यामुळे फार फरक पडणार नाही असंल काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक जनता ठरवेल, असे तज्ज्ञानी सांगितले.
5) हरियानात काँग्रेसच्या विजयाचे दावे केले जात होते. राहुल गांधी स्वतः खूप सक्रिय होते. पण, या पराभवामुळे काँग्रेसचे मनोधैर्य खचू शकते आणि काँग्रेस पुन्हा एकदा गटबाजी आणि कलहाचा बळी ठरू शकते. यामुळे राहुल गांधींच्या निवडणूक रणनीतीवरही प्रश्न उपस्थित होऊ शकतात
6) हरियानातील निवडणूक जिंकल्यास आपली सौदेबाजीची ताकद वाढेल, अशी काँग्रेसला आशा होती, मात्र आता हरियानातील पराभवाने काँग्रेसला बॅकफूटवर आणले आहे. या संधीचा फायदा घेत शिवसेना (उद्धव) फ्रंटफूटवर आली असून मित्रपक्षांशिवाय काँग्रेस भाजपला कधीही पराभूत करू शकत नाही, असे काँग्रेसला सांगू लागली आहे.
#Electionwithsakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.