

कोपरगाव : उंच झाडावरचे मधमाशांचे पोळ काढताना जोखीम पत्करून मोठी यातायात करावी लागते. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना मात्र या विधानसभा निवडणुकीत छोटे झुडूप असलेल्या तरवडाला मोहोळ घावलं.या विधानसभा निवडणुकीत आपल्याला परंपरागत तुल्यबळ राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या कोल्हे परिवारातील सदस्यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागेल. हे गृहित धरून गेली पाच वर्षे त्यांनी विकासकामे आणि जनसंपर्काची शर्थ केली. निवडणूक लढवायची वेळ आली, तर कोल्हे परिवाराने थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काळे यांच्या बाबतीत तरवडाला मोहोळ घावलं ही म्हण सार्थ ठरली.