Navneet Ranaesakal
Maharashtra Election 2025 Result
Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?
Attempted Attack on Navneet Rana During Election Rally: दर्यापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची हवा आधीच तापलेली असताना ही घटना अधिक चर्चेत आली आहे. या हल्ल्यामुळे मतदारांवर काय परिणाम होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना वेग आला असतानाच अमरावतीच्या खल्लार गावात घडलेल्या घटनेने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार येथे खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत हल्ला झाला. यावेळी काही उपस्थितांनी राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अंगरक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना सुरक्षित ठेवलं.

