
पुणेः विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन पुकारले आहे. शनिवारी त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. आढाव यांच्या आंदोलनाला सकाळी शरद पवारांनी भेट दिल्यानंतर दुपारी अजित पवारांनी भेट दिली. यावेळी अजित पवारांनी आढाव यांच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.