
बीड: बीड विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुन्हा आमदार संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली होती. तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. योगेश क्षीरसागर हे रिंगणात होते. त्यांच्यासह डॉ. ज्योती मेटे, अनिल जगताप आणि १९ अपक्ष लढत होते.