
बेलापूर विधानसभा संघातून भाजप पक्षाच्या मंदा म्हात्रे यांचा 1554 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे संदीप नाईक यांचा पराभव केलाय.
गणेश नाईक आणि त्यांच्या मुलाला वेगळ्या पक्षात पाठवण्यासाठी बेलापूर विधानसभातल्या या मतदारसंघाची उमेदवारी कारणीभूत ठरली. बेलापूर विधानसभा मतदारसंघ - १५१ त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चर्चेत आला आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या मतदारसंघातून यंदा भाजपतर्फे मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे गणेश नाईकांचा मुलगा संदीप नाईक यांनी निवडणूक लढवली.