
Bhandup West Assembly Election 2024 Result : गेली दोन टर्म भांडूप पश्चिम हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. या वेळी उद्धव ठाकरे गट विरूद्ध शिवसेना शिंदे गट विरूद्ध मनसे असा सामना पाहायला मिळाला. विद्यमान आमदार रमेश कोरगावकर यांना उद्धव ठाकरे गटाकडून, तर माजी आमदार अशोक पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली होती. तर मनसेने शिरीष सावंत या नव्या चेहऱ्याला संधी दिली होती. रमेश कोरगावकर आणि अशोक पाटील यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. ज्यामध्ये अशोक पाटील यांनी ६७६४ मतांनी बाजी मारली.
या मतदार संघात रमेश कोरगावकर हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार होते. त्यांच्याकडून शिंदेंच्या शिवसेनेने हा मतदार संघ खेचून घेतला आहे. कोरगावकर यांना एकूण ७०९९० मते मिळाली, तर अशोक पाटील यांच्या पारड्यात ७७७५४ मते पडली. तर मनसेला २३२३५ मतांवर समाधान मानावे लागले.