
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेतील. अशावेळी भारतीय जनता पक्षासाठी याहून आनंदाची बाब कोणतीही होऊ शकत नाही. कारण की फडणवीस किंबहुना भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी पक्षाची इच्छा होती. अशावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्यांची कोंडी करू शकतो. याविषयी विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.