
हेमंत रासने
प्रमुख, कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक तथा उमेदवार
शिक्षण - बी. कॉम.
पक्ष - भारतीय जनता पक्ष
रासने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते. रासने हे गणेश मंडळाचे कार्यकर्ता असून श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग गणेश मंडळाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. ते २०२३मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख होते, तसेच सध्या सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. २००७ पासून सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक होते. सध्या ते बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.