
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या नियुक्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा या मंत्रिपदासाठी भुजबळांची नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. मात्र, भुजबळांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दमानिया यांनी युती सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधातील आपल्या लढ्याचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिले असून, आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत मोठी भूमिका जाहीर करण्याची घोषणा केली आहे.