Vidhan Sabha Elections 2024 : छत्रपती संभाजीनगरमध्ये दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील वयोवृद्ध मतदारांसाठी १५० ऑटोरिक्षा आणि १,५१० व्हिलचेअर उपलब्ध केली जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदार तसेच ८५ वर्ष वयापुढील मतदारांची ने-आण करण्यासाठी १५० ऑटोरिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत; तसेच १ हजार ५१० व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.