Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांनी त्यांना कडवी झुंज दिली. चिपळूण तालुक्यात दोन्ही उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र, संगमेश्वर आणि देवरुख मधून निकम यांना आघाडी मिळाली ती कायम टिकली, त्यामुळे शेखर निकम यांचा ६७२२ मतांनी विजयी झाला.
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शेखर निकम तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते. शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांच्याशी त्यांची लढत झाली. निवडणुकीच्या रिंगणामध्ये सहा उमेदवार होते. प्रशांत यादव आणि शेखर निकम नावाचे आणखीन दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याशिवाय दोन अपक्षांनी निवडणूक लढवली. परंतु, थेट लढत निकम आणि यादव यांच्यात झाली.