
लातूर : सर्वधर्मसमभावाचा विचार, जात विरहित समाज हा महात्मा बसवेश्वरांनी दिलेला मंत्र आहे. काँग्रेसने सुद्धा सर्वधर्मसमभाव हाच विचार सुरवातीपासून जोपासला. गेल्या पन्नास वर्षांमध्ये काँग्रेसने लातूरमध्ये याच विचारांवर राजकारण केले. दिवंगत केशवराव सोनवणे, विलासराव देशमुख यांच्यापासून नेते शिवराज पाटील चाकूरकर, माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी सामान्य माणसाचे हित जोपासण्याचेच राजकारण केले, असे मत माजीमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.