
मुंबई - तीन वर्षांत सहकारी पक्षाला सामावून घेण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदावर आमच्या नेत्याने समाधान मानले असले तरी आता नव्या रचनेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीचे प्रतिध्वनी दिल्लीपर्यंत पोहोचले असून ‘महाराष्ट्र नायक’ झालेल्या फडणवीस यांना आता मुख्यमंत्रिपदापासून रोखणे हे काहीसे कठीण होण्याची शक्यता आहे.